Tuesday, 13 October 2026
तंत्रज्ञान

WhatsApp Subscription : आता WhatsApp वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार? Ad-Free प्लॅनची तयारी

लेखक: aniketpatil1888 January 27, 2026 1 min read 0 कमेंट्स

दैनंदिन आयुष्यात WhatsApp शिवाय एकही दिवस पूर्ण होत नाही. मेसेज, कॉल, फोटो, व्हिडिओ, ऑफिसचे काम असो वा वैयक्तिक गप्पा सगळीकडे WhatsApp हाच आधार. पण आता याच WhatsApp बद्दल एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर येत आहे.

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, WhatsApp लवकरच सबस्क्रिप्शन मॉडेल आणू शकतो, म्हणजेच हे ॲप वापरण्यासाठी भविष्यात पैसे मोजावे लागू शकतात. सध्या WhatsApp पूर्णपणे फ्री आहे, पण हे चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

WhatsApp Free राहणार नाही? काय आहे नेमकं प्रकरण

Meta (Facebook ची पॅरेंट कंपनी) गेल्या काही काळापासून WhatsApp मधून उत्पन्न वाढवण्यावर काम करत आहे. मागील वर्षी WhatsApp च्या Status आणि Channels सेक्शनमध्ये जाहिरातींची चाचणी सुरू करण्यात आली होती. या निर्णयावर युजर्सकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली होती.

हे वाचा: कमी पैशात महागड्या iPhone ची मजा! Apple चा सेल्फी स्पेशल iPhone 17e फेब्रुवारीत लाँच होणार?

मात्र, टीकेनंतरही कंपनीने माघार न घेता आता Ad-Free WhatsApp Subscription चा पर्याय आणण्याची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.

WhatsApp च्या कोडमध्ये सापडले धक्कादायक संकेत

WhatsApp च्या Version 2.26.3.9 मध्ये काही नवीन कोड स्ट्रिंग्स आढळल्या आहेत. या स्ट्रिंग्समधून हे स्पष्ट होतंय की —

  • Status आणि Channels मधील जाहिराती हटवण्यासाठी
  • वेगळं Paid Subscription Plan उपलब्ध केला जाऊ शकतो
  • Paid युजर्सना जाहिरातमुक्त (Ad-Free) अनुभव दिला जाईल

सध्या याबाबत Meta कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी रिपोर्ट्सनुसार कंपनी या कल्पनेवर गंभीरपणे काम करत आहे.

WhatsApp Ad-Free Subscription घेतल्यावर काय मिळेल?

जर तुम्ही WhatsApp चे सबस्क्रिप्शन घेतले, तर Status आणि Channels मध्ये एकही जाहिरात दिसणार नाही

WhatsApp वापरण्याचा अनुभव अधिक स्वच्छ आणि वेगवान असेल

वारंवार येणाऱ्या प्रमोशनल पोस्ट्सपासून सुटका मिळेल

पण जर तुम्ही पैसे भरले नाहीत, तर Status आणि Channels मध्ये जाहिराती पाहाव्या लागू शकतात. महत्वाचं म्हणजे, Personal Chats, Calls किंवा Groups मध्ये जाहिराती येणार नाहीत, असं सध्या रिपोर्ट्समध्ये स्पष्ट केलं जात आहे.

सबस्क्रिप्शनची किंमत किती असेल?

आत्तापर्यंत सबस्क्रिप्शनची किंमत भारतात ते कधी लागू होईल जाहिराती काढून टाकण्याव्यतिरिक्त आणखी कोणते फीचर्स मिळतील

याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, WhatsApp फ्री राहणार की नाही, यावर येत्या काळात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही WhatsApp रोज वापरत असाल, तर येणाऱ्या अपडेट्सकडे लक्ष ठेवा. कारण फ्री WhatsApp ची सवय लवकरच बदलू शकते.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *