Elon Musk यांच्या पोस्टने WhatsApp युजर्समध्ये खळबळ, ‘मॅसेज सुरक्षित नाहीत’ असा दावा..
टेस्ला आणि X (पूर्वीचे ट्विटर) चे मालक, अब्जाधीश Elon Musk यांनी WhatsApp संदर्भात केलेल्या एका पोस्टमुळे जगभरातील कोट्यवधी युजर्समध्ये चिंता वाढली आहे. मस्क यांनी थेट दावा केला आहे की WhatsApp वरील संदेश पूर्णपणे सुरक्षित नाहीत, तसेच युजर्सनी मॅसेजिंगसाठी X Chat या सेवेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ही पोस्ट अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा WhatsApp विरोधात अमेरिकन कोर्टात एक महत्त्वाचा कायदेशीर खटला सुरू आहे.
Elon Musk ने नेमकं काय म्हटलं?
Elon Musk यांनी X वर पोस्ट करत WhatsApp च्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
त्यांनी म्हटलं की WhatsApp सुरक्षित नाही. युजर्सनी खासगी संवादासाठी X Chat वापरावा.
WhatsApp is not secure. Even Signal is questionable.
— Elon Musk (@elonmusk) January 27, 2026
Use 𝕏 Chat. https://t.co/MWXCOmkbTD
विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये त्यांनी Signal या अॅपवरही अप्रत्यक्ष टीका केल्याचं बोललं जात आहे. मस्क यांची ही पोस्ट व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं.
WhatsApp विरोधात खटला कोणी आणि का दाखल केला?
ब्लूमबर्ग च्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका येथील WhatsApp युजर्सच्या एका गटाने अमेरिकेत हा खटला दाखल केला आहे.
या युजर्सचा दावा आहे की –
- WhatsApp ची सुरक्षा दावा केल्याइतकी मजबूत नाही
- Meta (Facebook ची पॅरेंट कंपनी) चे कर्मचारी गरज पडल्यास खासगी मॅसेजेस अॅक्सेस करू शकतात याच दाव्यांमुळे हा खटला चर्चेत आला आहे.
रिअल-टाइममध्ये मॅसेज वाचता येतात” असा गंभीर आरोप
या खटल्याचा आधार एका साक्षीदाराची साक्ष असल्याचं सांगितलं जात आहे.
तक्रारीनुसार –
- Meta च्या इंटरनल सिस्टीममध्ये एक अशी प्रक्रिया आहे
- ज्याद्वारे एन्क्रिप्शन बायपास करता येऊ शकतं
- एका इंजिनिअरची रिक्वेस्ट मंजूर झाली की
- कर्मचाऱ्यांना युजरच्या Unique ID द्वारे रिअल-टाइममध्ये मॅसेज पाहण्याची परवानगी मिळू शकते
- ही तक्रार तब्बल 51 पानांची आहे.
मात्र दाव्यांना तांत्रिक पुरावा नाही
महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत या आरोपांना सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस तांत्रिक पुरावा सादर करण्यात आलेला नाही.
हे वाचा: WhatsApp Subscription : आता WhatsApp वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार? Ad-Free प्लॅनची तयारी
WhatsApp ने कायमच सांगितलं आहे की End-to-End Encryption Key फक्त Sender आणि Receiver च्या डिव्हाइसवर असते. कंपनीकडे स्वतःकडेही मॅसेज डीक्रिप्ट करण्याची क्षमता नाही
Meta कडून आरोपांचा ठाम इन्कार
Meta कंपनीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. PCMag शी बोलताना Meta च्या प्रवक्त्याने सांगितले की हे आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. WhatsApp गेल्या दहा वर्षांपासून Signal Protocol वापरतो. हा खटला निराधार असून प्रतिवादी वकिलांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे
मग युजर्सनी काय करावं?
सध्या तरी – WhatsApp बंद करण्याचा कोणताही अधिकृत इशारा नाही. कोर्टाचा अंतिम निकाल येणं बाकी आहे. Elon Musk यांची पोस्ट वैयक्तिक मत म्हणून पाहिली जात आहे तरीही, या प्रकरणामुळे डिजिटल प्रायव्हसी आणि डेटा सिक्युरिटी हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
