Tuesday, 13 October 2026
आंतरराष्ट्रीय

Russian Oil Tanker वाद पेटला: अमेरिकेची थेट कारवाई, पुतिनची पाणबुडी मैदानात; 3 भारतीय नागरिक धोक्यात!

लेखक: aniketpatil1888 January 9, 2026 1 min read 0 कमेंट्स

युक्रेन युद्धामुळे आधीच तणावपूर्ण झालेल्या अमेरिका–रशिया संबंधांमध्ये आता एका रशियन तेल टँकरमुळे मोठा स्फोटक वाद निर्माण झाला आहे. वेनेजुएलाच्या समुद्रात अमेरिकेने रशियाचा तेल टँकर ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही महासत्ता आमने-सामने उभ्या ठाकल्या आहेत. या घटनेला आणखी गंभीर वळण देत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाणबुडी तैनात केल्याची माहिती समोर आली आहे.

Russian Oil Tanker dispute flares up

अमेरिकेच्या या कारवाईचा भारताशीही थेट संबंध आहे. कारण या तेल टँकरवरील चालक दलामध्ये तीन भारतीय नागरिकांचा समावेश आहे, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेची कारवाई आणि रशियाचा आक्रमक पवित्रा

मागील आठवड्यात अमेरिकेने वेनेजुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केल्यानंतर तणाव अधिक वाढला. त्यानंतरच वेनेजुएलाच्या समुद्रात असलेला ‘मॅरिनेरा’ (Marinera) हा रशियन तेल टँकर अमेरिकी कोस्ट गार्डने ताब्यात घेतला. या घटनेनंतर रशियाने तीव्र प्रतिक्रिया देत आपली पाणबुडी संबंधित भागात पाठवली. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त करत अमेरिकेला आंतरराष्ट्रीय समुद्री कायद्याचे पालन करण्याची स्पष्ट मागणी केली आहे.

टँकरवरील चालक दलात कोण कोण?

सूत्रांच्या माहितीनुसार, मॅरिनेरा तेल टँकरवरील चालक दलामध्ये

17 युक्रेनी नागरिक

6 जॉर्जियन नागरिक

3 भारतीय नागरिक

2 रशियन नागरिक

यांचा समावेश आहे. यामुळे भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रशियन परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप

रशियन परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की,
अमेरिकेचे राष्ट्रीय प्रतिबंध कायदे आणि एकतर्फी निर्बंध बेकायदेशीर आणि निराधार आहेत. खुल्या समुद्रात एखादे जहाज जप्त करणे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हेही वाचा: मुंबईत 15 जानेवारीला सुट्टी जाहीर! BMC निवडणुकीसाठी सरकारचा मोठा निर्णय

रशियानुसार,

  • मॅरिनेरा टँकरला 24 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय आणि रशियन कायद्यानुसार वैध परवानगी मिळाली होती.
  • हा टँकर उत्तर अटलांटिकमधील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातून शांततेने प्रवास करत होता.
  • टँकर रशियन बंदराच्या दिशेने जात होता.

‘डार्क फ्लीट’ आणि डिसेंबरमधील घटना

डिसेंबर महिन्यात Bella 1 नावाच्या टँकरने वेनेजुएलामध्ये तेल भरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो अयशस्वी ठरला. हा टँकर रशियाच्या दिशेने निघाला होता. अमेरिकेचा आरोप आहे की, रशिया ‘डार्क फ्लीट’च्या माध्यमातून बेकायदेशीर तेल व्यापार करत आहे. याच कारणामुळे अमेरिकेने डिसेंबरमध्येच हा टँकर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *