Tuesday, 13 October 2026
Latest News

मुंबईत 15 जानेवारीला सुट्टी जाहीर! BMC निवडणुकीसाठी सरकारचा मोठा निर्णय

लेखक: aniketpatil1888 January 8, 2026 1 min read 1 कमेंट

महाराष्ट्रात होणाऱ्या बीएमसीसह २९ महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी मुंबई शहर, मुंबई उपनगर तसेच राज्यातील संबंधित २९ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये लागू असणार आहे.

मतदारांना आपला मतदानाचा हक्क सहजपणे बजावता यावा, या उद्देशाने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सुट्टी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या २०२६ सालच्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीत समाविष्ट नव्हती. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, ही सार्वजनिक सुट्टी केवळ निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतच लागू राहील.

मतदानाची वेळ काय?

१५ जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया सकाळी ७.३० वाजल्यापासून संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत पार पडणार आहे. सर्व पात्र मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शेअर बाजार आणि RBI बाबत काय?

या सार्वजनिक सुट्टीमुळे मुंबईतील शेअर बाजार बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच RBI च्या मुंबईसाठीच्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीत १५ जानेवारीचा उल्लेख नाही.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana: अपात्र लाभार्थ्यांवर पहिली मोठी कारवाई, शासकीय कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल

खाजगी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार का?

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुट्टीबाबत कोणताही बंधनकारक निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नाही. संबंधित खासगी संस्था आणि कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सकाळी किंवा संध्याकाळी दोन तासांची सवलत देऊ शकतात.

निकाल कधी?

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी एकाच टप्प्यात घेण्याची घोषणा केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे.

बीएमसीचा कारभार आणि बजेट

आशियातील सर्वात मोठी नागरी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएमसीचे २०२५–२६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक ७४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

मुंबई महापालिकेतील मतदारसंख्या

बीएमसी निवडणुकीत एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ५५,१६,७०७ पुरुष, ४८,२६,५०९ महिला आणि १,०९९ इतर मतदारांचा समावेश आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अखंड शिवसेनेने ८४ जागांवर विजय मिळवला होता.

1 कमेंट

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *