केंद्रिय लोकसेवा आयोगाने (UPSC) 4 फेब्रुवारी 2026 रोजी सिव्हील सेवा परीक्षा (CSE 2026) चे अधिकृत नोटिफिकेशन जारी केले आहे. यंदा आयोगाने सेवा वाटप (Service Allocation), पुन्हा परीक्षा देण्याचे नियम आणि डिजिटल सुरक्षेबाबत मोठे बदल केले आहेत.

या बदलांचा सर्वाधिक परिणाम आधीच IAS, IPS, IFS किंवा Group-A सेवेत निवड झालेल्या उमेदवारांवर होणार आहे.
IPS, IAS आणि IFS उमेदवारांसाठी महत्त्वाचा बदल
UPSC च्या नव्या नियमांनुसार, एखाद्या उमेदवाराची आधीच IPS साठी निवड झाली असेल, तर CSE 2026 द्वारे पुन्हा IPS चा पर्याय निवडता येणार नाही. तसेच, जे उमेदवार आधीच कार्यरत IAS किंवा IFS अधिकारी आहेत, त्यांना आता सिव्हील सेवा परीक्षेला बसता येणार नाही.
आयोगाने स्पष्ट केलं आहे की, मुख्य परीक्षेआधी एखाद्या उमेदवाराची IAS/IPS/IFS मध्ये निवड झाली, तर त्या उमेदवाराला मुख्य परीक्षा देण्याची परवानगी मिळणार नाही. यामुळे एकाच सेवेसाठी वारंवार प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांवर थेट मर्यादा येणार आहे.
2026–27 साठी “अंतिम संधी” कोणाला?
UPSC ने 2025 किंवा त्याआधी कोणत्याही सेवेत जॉईन झालेल्या उमेदवारांसाठी एक विशेष तरतूद केली आहे. अशा उमेदवारांना 2026 किंवा 2027 मध्ये एक अंतिम प्रयत्न करण्याची संधी देण्यात आली आहे, तीही राजीनामा न देता.
मात्र, 2026 मध्ये Group-A सेवेत निवड झाल्यानंतर पुन्हा परीक्षा द्यायची असल्यास, उमेदवाराला संबंधित विभागाकडून ट्रेनिंगसाठी सुट मिळणे अनिवार्य असेल. जर उमेदवार ट्रेनिंगमध्ये सामील झाला नाही किंवा मुद्दाम विलंब केला, तर 2026 चा अर्ज थेट रद्द केला जाणार आहे. तसेच, 2027 मध्ये पुन्हा निवड झाल्यास दोन्हींपैकी एकच सेवा ठेवावी लागेल.
AI, आधार पडताळणी आणि नवे डिजिटल नियम
फसवणूक रोखण्यासाठी UPSC ने यंदा AI-आधारित फेस रेकग्निशन आणि आधार पडताळणी अनिवार्य केली आहे. उमेदवारांना आता चार-टप्प्यांच्या नवीन डिजिटल पोर्टलवर नोंदणी करावी लागणार असून, ही संपूर्ण प्रक्रिया आधार कार्डशी लिंक असणार आहे. आयोगाच्या मते, या बदलांमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे.
पात्रता (Eligibility Criteria)
- IAS (Indian Administrative Service): भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक
- IFS (Indian Forest Service): पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी किंवा प्राणीशास्त्र विषयातील पदवी आवश्यक
FAQ तुम्हाला पडलेले प्रश्न ?
प्रश्न 1. UPSC CSE 2026 मध्ये IPS उमेदवारांसाठी काय बदल आहे?
आधी IPS मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुन्हा IPS निवडता येणार नाही.
प्रश्न 2 . कार्यरत IAS किंवा IFS अधिकारी CSE 2026 देऊ शकतात का?
नाही, कार्यरत IAS आणि IFS अधिकाऱ्यांना परीक्षा देण्यास मनाई आहे.
प्रश्न 3. UPSC 2026 मध्ये आधार आणि AI तपासणी बंधनकारक आहे का?
होय, AI-आधारित फेस रेकग्निशन आणि आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.


1 thought on “UPSC CSE 2026 Notification: सेवा वाटपात मोठा बदल, IAS-IPS नियम कडक”