WiFi चे नाव वाय-फायच का? ‘Wireless Fidelity’ खरंच अर्थ आहे का? जाणून घ्या खरी गोष्ट
आजच्या डिजिटल युगात WiFi शिवाय आयुष्य अपूर्ण वाटतं. मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही असो वा ऑफिसचं काम — सर्वकाही वायफायवर चालतं.पण तुम्हाला माहिती आहे का, WiFi ला वाय-फाय असंच नाव का देण्यात आलं? त्याचा खरा अर्थ काय?

आश्चर्य म्हणजे, रोज वापरणाऱ्यांपैकी बहुतेक लोकांना यामागची खरी गोष्ट माहितच नाही. चला तर जाणून घेऊया WiFi चा इतिहास, अर्थ आणि त्यामागचं सत्य.
काय आहे WiFi?
WiFi हे Wireless Networking Technology आहे. याच्या मदतीने कोणत्याही तारेशिवाय (केबल न वापरता) डिव्हाइस इंटरनेटशी जोडता येतात. मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्ट टीव्ही यांसारखी उपकरणं रेडिओ फ्रीक्वेन्सी सिग्नल्सद्वारे डेटा पाठवतात आणि स्वीकारतात.
तांत्रिक भाषेत WiFi हे WLAN (Wireless Local Area Network) वर आधारित असते.
WiFi म्हणजे Wireless Fidelity का?
बर्याच लोकांना वाटतं की WiFi म्हणजे Wireless Fidelity.
पण ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे.
- WiFi हा कोणत्याही शब्दाचा Short Form नाही.
- WiFi हे एक Brand Name आहे.
1999 साली Wi-Fi Alliance या आंतरराष्ट्रीय संस्थेने हे नाव निवडलं.
WiFi नाव ठेवण्यामागील खरी गोष्ट
WiFi टेक्नॉलॉजीचा मूळ तांत्रिक नाव होतं – IEEE 802.11 पण हे नाव सामान्य लोकांसाठी खूपच अवघड होतं. म्हणूनच: सर्वसामान्यांना उच्चारता येईल असं WiFi हे नाव निवडण्यात आलं. हे नाव Hi-Fi (High Fidelity) या लोकप्रिय ऑडिओ टर्मवरून प्रेरित आहे.
Hi-Fi प्रमाणेच WiFi देखील quality आणि reliability दर्शवण्यासाठी वापरलं गेलं.
WiFi कसं काम करतं?
WiFi Router इंटरनेट केबलशी जोडलेला असतो. हा Router रेडिओ सिग्नल्स द्वारे आजूबाजूच्या डिव्हाइसपर्यंत नेटवर्क पोहोचवतो. डिव्हाइस: सिग्नल पकडतं Router शी कनेक्ट होतं इंटरनेट डेटा वापरतं त्यामुळेच केबलशिवाय इंटरनेट वापरणं शक्य होतं.
हे वाचा: आयफोन 17 प्रो व 17 प्रो मॅक्स स्वस्तात खरेदीची संधी! Amazon Republic Day Sale 2026 मध्ये मोठी सूट
Free WiFi वापरताना धोका का?
Free किंवा Open WiFi Network वापरणं धोकादायक ठरू शकतं, कारण: डेटा चोरी (Data Theft) बँकिंग फ्रॉड फोटो व वैयक्तिक माहितीचा गैरवापर हॅकिंगचा धोका सायबर भामटे असुरक्षित WiFi नेटवर्क सहज हॅक करू शकतात. म्हणूनच Public WiFi वापरताना नेहमी काळजी घ्यावी.
सुरक्षित WiFi साठी टिप्स
Strong Password वापरा
Public WiFi वर बँकिंग काम टाळा
VPN वापरणं सुरक्षित
Router अपडेट ठेवा
