आज भारतात Realme P4 Power 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च झाला आहे, ज्याची खासियत म्हणजे 10,001mAh इतकी दमदार बॅटरी आहे जे एका mainstream फोनमध्ये आजपर्यंत पाहिली गेलेली सर्वात मोठी बॅटरी आहे.

या फोनमध्ये 6.8-इंच 1.5K 4D Curve+ HyperGlow AMOLED display आहे, ज्याचा refresh rate 144Hz पर्यंत आहे. नुकत्याच उपलब्ध pricing नुसार, या फोनची किंमत भारतात ₹25,999 पासून सुरू होते आणि वरच्या variants ₹30,999 पर्यंत आहेत.
Realme P4 Power 5G मध्ये MediaTek Dimensity 7400 Ultra chipset, 50 MP Sony मुख्य कॅमेरा, आणि Android 16-आधारित Realme UI 7.0 मिळते. कंपनीने याला 80W त्वरित चार्जिंग आणि 27W reverse charging ची सुविधा दिली आहे, ज्यामुळे फोन दुसऱ्या डिव्हाइसेसना चार्ज करू शकतो.
हेही वाचा: Vivo X200T भारतात येतोय? Flipkart वर मायक्रोसाईट लाईव्ह, फीचर्स ऐकून धक्का बसेल..
हेही वाचा: आधार अॅपचा नवीन व्हर्जन लाँच; मोबाईल नंबर आणि पत्ता अपडेट करणं आता घरबसल्या सोपं..
या फोनमध्ये IP69/IP68/IP66 प्रमाणित dust-water resistance, 6,500 nits peak brightness display आणि robust build quality देखील आहे. Realme या डिव्हाइससाठी 3 वर्षांची OS updates आणि 4 वर्षांची security support देण्याचे वचन दिले आहे.
Realme P4 Power 5G ची विक्री 5 फेब्रुवारीपासून Flipkart, Realme.com आणि निवडक ऑफलाइन स्टोअर्सवर सुरू झाली होती. लॉन्च ऑफर्समध्ये बँक डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि काही मॉडेलवर चार वर्षांची बॅटरी वॉरंटी मिळते.
या फोनला battery lovers आणि heavy users मध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळतोय, खासकरून ज्यांना एकाच चार्जमध्ये मोठा उपयोग हवा आहे त्यांच्यासाठी ही डिव्हाइस एक चांगला पर्याय ठरू शकतो.

