Tuesday, 13 October 2026
तंत्रज्ञान

Google Motion Assist: प्रवासात फोन वापरताना Motion Sickness होणार नाही? Android 17 मध्ये Googleचे भन्नाट फीचर

लेखक: aniketpatil1888 September 7, 2026 1 min read 0 कमेंट्स

आपण कुठे पण फिरायाला जाताना कार, बस किंवा ट्रेनमध्ये मोबाईल वापरताना अनेकांना मळमळ, चक्कर किंवा अस्वस्थपणा जाणवतो. यालाच साधारणपणे Motion Sickness म्हटले जाते. आता Google ने Android 17 वापरणाऱ्या स्मार्टफोनसाठी यावर मदत करणारे नवीन फीचर आणले आहे. यामध्ये Motion Assist असे या फीचरचे नाव असून स्क्रीनवर दिसणारा एक छोटा बबल वाहनाच्या हालचालीसोबत हलतो. त्यामुळे फोनच्या स्क्रीनकडे पाहताना डोळ्यांना मिळणारी दृश्य माहिती आणि शरीराला जाणवणारी हालचाल यातील फरक कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

प्रवासातील Motion Sickness कमी करण्यासाठी Google चे Motion Assist फीचर

Google ने सप्टेंबर 2026 Android Feature Drop मध्ये Motion Assistचा समावेश केला आहे. हे फीचर खास Android 17 वर चालणाऱ्या फोनसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे Android 16 किंवा त्यापेक्षा जुन्या मॉडेलवर असलेल्या फोनमध्ये हे फीचर मिळेलच असे नाही. तसेच डिव्हाइस आणि प्रदेशानुसार उपलब्धतेमध्ये फरक असू शकतो.

Motion Assist नेमकं काय काम करतं?

Motion Assist सुरू केल्यानंतर फोनच्या स्क्रीनवर एक सूक्ष्म बबल ओव्हरले दिसते. वाहन पुढे-मागे किंवा वळण घेताना फोनच्या हालचालीप्रमाणे हा बबल स्क्रीनवर हलतो. Google च्या मते याचा उद्देश डोळ्यांना स्क्रीनवर दिसणारी माहिती आणि शरीराला जाणवणारी वाहनाची हालचाल यांच्यातील अंतर कमी करणे हा आहे. त्यामुळे प्रवासात फोन वाचताना किंवा स्क्रीन पाहताना होणारा Motion Sickness कमी होण्यास काही वापरकर्त्यांना मदत मिळू शकते. हे फीचर विशेषतः कारच्या passenger seat वर बसून मोबाईल वापरणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते. उदाहरणार्थ प्रवासात बातम्या वाचणे, मेसेज पाहणे किंवा व्हिडिओ पाहताना त्रास होत असेल तर Motion Assist वापरून पाहता येईल.

Android 17 फोनमध्येच मिळणार फीचर

Motion Assistची सर्वात महत्त्वाची अट म्हणजे Android 17. Google च्या अधिकृत माहितीनुसार या फीचरसाठी Android 17 आवश्यक आहे. त्यामुळे फोनमध्ये Android 17 अपडेट उपलब्ध झाल्यानंतरच हे फीचर वापरता येईल. मात्र Android 17 असलेल्या प्रत्येक फोनमध्ये हे फीचर एकाच वेळी उपलब्ध होईलच असे नाही कारण अपडेटचा रोलआउट डिव्हाइस आणि राज्यनुसार बदलू शकतो. Google ने सप्टेंबर Android Drop सोबत Motion Assistसह इतरही नवीन फीचर्स आणले आहेत. यामध्ये Gemini आणि Find Hub मधील नवीन सुविधा, Gemini Live मधील Guided Vision तसेच Google Messages मध्ये Google Keep नोट्स आणि Chat Themes यांचा समावेश देखील आहे.

फीचर आपोआप सुरू करता येणार

Motion Assist वापरण्यासाठी प्रत्येक वेळी सेटिंग्जमध्ये जाऊन फीचर सुरू करण्याची गरज पडू नये यासाठी Google ने Auto Start पर्याय दिला आहे. वापरकर्ते ते वाहनातील प्रवासादरम्यान आपोआप सुरू होण्यासाठी सेट करू शकतात. तसेच Quick Settings मध्ये Motion Assistचा शॉर्टकटही ठेवता येतो. याशिवाय स्क्रीनवर दिसणाऱ्या बबलचे काही पर्यायही बदलता येतात. Google च्या माहितीनुसार त्याचा आकार, रंग आणि opacity म्हणजेच पारदर्शकता वापरकर्त्याला आपल्या पसंतीनुसार बदलता येते. त्यामुळे स्क्रीनवर सतत दिसणारा बबल त्रासदायक वाटू नये यासाठी त्याचे स्वरूप कस्टमाइज करता येते.

WhatsApp New Update 2026 : आता WhatsApp वरूनच भरा वीज, पाणी, गॅस, FASTag आणि क्रेडिट कार्डचे बिल

प्रवासात मोबाईल वापरणाऱ्यांसाठी उपयोगी

आजकाल प्रवास करताना मोबाईलवर बातम्या वाचणे, सोशल मीडिया पाहणे, ईमेल तपासणे किंवा व्हिडिओ पाहणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र वाहनाची हालचाल आणि स्क्रीनवरील स्थिर मजकूर किंवा चित्र यामुळे काही लोकांना चक्कर किंवा मळमळ होऊ शकते. Motion Assist अशा परिस्थितीत स्क्रीनवर वाहनाच्या हालचालीशी संबंधित दृश्य संकेत देण्याचा प्रयत्न करते. Google चे म्हणणे आहे की यामुळे Motion Sickness कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र हे फीचर प्रत्येक व्यक्तीवर समान परिणाम करेलच असे नाही. Google स्वतःही परिणाम वेगवेगळे असू शकतात असे स्पष्ट करते आणि काही लोकांना उलट त्रास वाढू शकतो. अस्वस्थ वाटल्यास फीचर वापरणे थांबवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

वाहन चालवताना Motion Assist वापरू नका

हे फीचर प्रवाशांसाठी तयार करण्यात आले आहे. त्यामुळे वाहन चालवताना Motion Assist किंवा फोनवरील इतर कोणत्याही फीचरचा वापर करणे टाळावे. Google ने स्पष्टपणे सांगितले आहे की हे फीचर वाहन चालवताना किंवा पूर्ण लक्ष आवश्यक असलेल्या सुरक्षिततेच्या परिस्थितीत वापरू नये. त्यामुळे कारमध्ये passenger म्हणून प्रवास करताना Motion Assistचा उपयोग करून पाहता येईल. पण ड्रायव्हिंग करताना मोबाईल पाहणे किंवा हे फीचर सेट करणे टाळणे अधिक सुरक्षित आहे.

Googleचे आणखी कोणते फीचर्स आले?

सप्टेंबर Android Drop मध्ये Motion Assist व्यतिरिक्त Gemini आणि Find Hub यांच्यातील नवीन सुविधा देखील देण्यात आली आहे. वापरकर्ता एखादी वस्तू कुठे ठेवली आहे हे Gemini ला सांगू शकतो आणि नंतर त्या माहितीच्या मदतीने ती वस्तू कुठे ठेवली होती हे शोधता येऊ शकते. ही सुविधा Android 16 किंवा त्यापुढील आवृत्तीवर उपलब्ध होणार आहे. याशिवाय Gemini Live मध्ये Guided Vision फीचर येत आहे. यात फोनचा कॅमेरा शेअर करून समोरच्या वस्तू किंवा मजकुराबद्दल आवाजाच्या माध्यमातून माहिती मिळवता येते. विशेषतः दृष्टिदोष किंवा कमी दृष्टी असलेल्या वापरकर्त्यांसाठी हे फीचर उपयोगी ठरू शकते.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *