NEET UG 2026 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. Medical Counselling Committee (MCC) ने NEET UG Counselling 2026 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून 5 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

यानंतर पात्र उमेदवारांना MBBS, BDS, BSc Nursing तसेच इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
5 ऑगस्टपासून सुरू होणार ऑनलाइन नोंदणी
MCC ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार Round 1 साठी नोंदणी आणि फी भरण्याची प्रक्रिया 5 ऑगस्टपासून सुरू होईल. उमेदवारांना अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर पसंतीचे महाविद्यालय आणि अभ्यासक्रम निवडण्याची (Choice Filling) संधी दिली जाईल. अंतिम सीट वाटप विद्यार्थ्यांच्या NEET Rank, Category, Seat Availability आणि Choice Preference यावर आधारित असेल.
महत्त्वाच्या तारखा एकदा पाहाच
- 4 ऑगस्ट – Seat Matrix प्रसिद्ध
- 5 ऑगस्ट – Registration सुरू
- 6 ऑगस्ट – Choice Filling सुरू
- 12 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत – Registration समाप्त
- 12 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत – Fee Payment
- 13 ऑगस्ट – Choice Filling आणि Locking
- त्यानंतर Round 1 Seat Allotment Result जाहीर केला जाईल.
Bihar Student Protest: विद्यार्थी आंदोलनातील सर्व गुन्हे मागे; बिहार सरकारचा मोठा निर्णय
कोणते विद्यार्थी सहभागी होऊ शकतात
NEET UG 2026 मध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी MCC च्या समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. ही प्रक्रिया प्रामुख्याने खालील प्रवेशांसाठी असते.
- 15% All India Quota (AIQ) MBBS/BDS
- AIIMS
- JIPMER
- Central Universities
- ESIC Colleges
- AFMC
- Deemed Universities
मात्र 85% राज्य कोट्यासाठी प्रत्येक राज्य स्वतंत्र समुपदेशन प्रक्रिया राबवते, त्यामुळे त्या प्रक्रियेसाठी वेगळी नोंदणी करावी लागेल.
यंदा काही नियमांमध्ये बदल
यंदाच्या समुपदेशन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा वेळ आणि प्रवास कमी व्हावा यासाठी काही प्रक्रियात्मक बदल करण्यात आले आहेत. अंतिम सीट स्वीकारल्यानंतरच प्रत्यक्ष रिपोर्टिंग करण्याची व्यवस्था, अधिक पारदर्शक ऑनलाइन प्रक्रिया आणि कागदपत्र पडताळणीची सुधारित पद्धत यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
नोंदणीपूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा
समुपदेशनासाठी विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत.
- NEET UG 2026 Scorecard
- Admit Card
- Class 10 आणि 12 Marksheet
- जन्मतारीख पुरावा
- आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- EWS/PwD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- स्वाक्षरी
कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक असल्यास प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
नोंदणी सुरू झाल्यानंतर शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकर अर्ज करणे योग्य ठरेल. कॉलेज निवडताना मागील वर्षांचे कट-ऑफ, फी, लोकेशन आणि उपलब्ध सुविधा यांचा विचार करावा. अधिकृत माहिती फक्त MCC च्या संकेतस्थळावरूनच तपासावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.

