Monday, 02 November 2026
Latest News

नवी मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या १० तास पाणीपुरवठा बंद; खारघर, कामोठेसह ७ विभागांना फटका

लेखक: aniketpatil1888 November 2, 2026 1 min read 0 कमेंट्स

नवी मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा तब्बल १० तास बंद ठेवण्यात येणार आहे.

सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत मोरबे धरणावरून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या साफसफाईच्या तयारीत असलेल्या नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

कोणत्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार?

या पाणीबंदीचा परिणाम बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या सात विभागांवर होणार आहे. याशिवाय सिडकोच्या खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठाही बंद राहणार आहे. जलवाहिन्यांवर विविध क्षमतेचे व्हॉल्व्ह आणि फ्लोमीटर बसवण्याचे काम या कालावधीत करण्यात येणार आहे.


ठाणेकरांनो लक्ष द्या! आजपासून दर सोमवारी १० टक्के पाणीकपात; ‘या’ भागांवर होणार परिणाम

बुधवार सकाळीही कमी दाबाने पाणी

मंगळवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार असून बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळीही काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा आधीच करून ठेवावा. पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पनवेल आणि उरणमध्येही पाणीकपात

दरम्यान, पनवेल आणि उरण तालुक्यातील सिडको वसाहतींमध्ये २ नोव्हेंबरपासून विभागनिहाय २४ तासांची पाणीकपात लागू करण्यात आली आहे. यंदा पावसाचे प्रमाण आणि उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबईसह पनवेल आणि उरण परिसरातील नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *