अमेरिकेसोबत भारताची मोठी ट्रेड डील झाली असून, या करारानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतासाठी आणखी एक मोठी गुडन्यूज समोर आली आहे.

आता जगातील शक्तिशाली देशांची ताकद फक्त कच्च्या तेलावर नाही, तर रेअर अर्थ मिनरल्सवर ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनविरोधात मोठा डाव खेळत भारतासह तब्बल 54 देशांना एकत्र आणले आहे. या आंतरराष्ट्रीय समूहात भारताची भूमिका केंद्रस्थानी असणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
रेअर अर्थ मिनरल्सवर चीनची मक्तेदारी मोडण्याचा डाव
सध्या जगातील जवळपास 90 टक्के रेअर अर्थ मिनरल्सच्या पुरवठ्यावर चीनची मक्तेदारी आहे. सेमीकंडक्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रिक वाहनं आणि संरक्षण क्षेत्रासाठी ही खनिजे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अमेरिकेने आंतरराष्ट्रीय पातळीवर रणनीती आखली आहे. या योजनेअंतर्गत भारतासह 54 देशांचा खनिज समूह तयार करण्यात येत असून, चीनची पकड कमकुवत करण्यावर भर दिला जाणार आहे. या निर्णयामुळे जागतिक आर्थिक समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत केंद्रस्थानी, 30 अब्ज डॉलरची गुंतवणूक
वॉशिंग्टन येथे 2026 मध्ये झालेल्या ‘क्रिटिकल मिनरल्स मिनिस्टीरियल’ बैठकीत या समूहाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, उपराष्ट्रपती जेड वेंन्स आणि अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट सहभागी झाले होते. भारताच्या वतीने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या बैठकीत सहभाग घेतला. यामध्ये FORGE आणि Pax Silica असे दोन गट तयार करण्यात आले असून, रेअर अर्थ आणि हाय-टेक खनिज पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. या उपक्रमासाठी अमेरिकेकडून सुमारे 30 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतासाठी ही मोठी संधी मानली जात असून, चीनला हा पहिला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
तुम्हाला पडलेले प्रश्न ?
प्रश्न 1. भारत-अमेरिका ट्रेड डीलचा मुख्य फायदा काय?
या करारामुळे अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केले असून, भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा फायदा होणार आहे.
प्रश्न 2. 54 देशांचा खनिज समूह का तयार करण्यात आला?
रेअर अर्थ मिनरल्समध्ये चीनची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी आणि सुरक्षित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हा समूह तयार करण्यात आला आहे.
प्रश्न 3. या समूहात भारताची भूमिका काय आहे?
भारत हा या आंतरराष्ट्रीय समूहाचा केंद्रबिंदू असून, निर्णय प्रक्रियेत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे.
प्रश्न 4. अमेरिकेची किती गुंतवणूक अपेक्षित आहे?
या उपक्रमासाठी अमेरिकेकडून सुमारे 30 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे.

