Tuesday, 13 October 2026
शिक्षण

मोठी अपडेट! 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिटाबाबत महत्वाचा निर्णय, बोर्डाची स्पष्ट सूचना

लेखक: aniketpatil1888 January 13, 2026 1 min read 0 कमेंट्स

दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तयारीला वेग आला आहे. अशातच इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. बोर्डाकडून बारावीच्या परीक्षेसाठी हॉल तिकिट वाटपाला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे.

राज्यातील बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून 18 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. हॉल तिकिटांची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी मानली जात आहे.

हॉल तिकिट कसे मिळणार?

बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार असले तरी, शिक्षण मंडळाने महाविद्यालयांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

  • महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकिट प्रिंट करून देणे बंधनकारक आहे.
  • हॉल तिकिट काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारता येणार नाही.

मुख्याध्यापकांची सही अनिवार्य

  • बोर्डाने हॉल तिकिटाबाबत एक महत्त्वाची अट घातली आहे.
  • हॉल तिकिटावर विद्यार्थ्याचा फोटो, मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का असणे आवश्यक
  • सही किंवा शिक्का नसल्यास परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला जाऊ शकतो

हे वाचा: शिष्यवृत्ती परीक्षा: ही परीक्षा कोणत्या वर्गासाठी आहे? सविस्तर जाणून घ्या..

  • फक्त ऑनलाईन डाउनलोड केलेले हॉल तिकिट ग्राह्य धरले जाणार नाही
  • विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी हॉल तिकिट व्यवस्थित तपासून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

12 वी परीक्षा 2026 – महत्वाच्या तारखा

  • परीक्षा सुरू: 10 फेब्रुवारी 2026
  • परीक्षा समाप्ती: 18 मार्च 2026
  • हॉल तिकिट वाटप: सुरू

परीक्षा कुठे होणार?

राज्यातील खालील 9 विभागांमधून बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे:

  • मुंबई
  • कोकण
  • पुणे
  • नाशिक
  • औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
  • अमरावती
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • लातूर

कॉपीमुक्त परीक्षांसाठी कडक पावले

यावर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त घेण्यासाठी बोर्डाकडून कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.

  • दहावीची 31 परीक्षा केंद्रे रद्द
  • बारावीची 76 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द
  • सर्वाधिक कारवाई छत्रपती संभाजीनगर विभागात
  • भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली
  • परीक्षा केंद्रांवर CCTV देखरेख

बोर्डाने स्पष्ट केलं आहे की कोणत्याही प्रकारची गैरप्रकारे खपवून घेतली जाणार नाहीत.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *