मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, व्हायरल क्लिपवरून मोठा वाद…
माजी महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक मिनाक्षी शिंदे यांच्याशी संबंधित व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे ठाणे जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एका कार्यकर्त्याला फोनवरून धमकावल्याचा आणि आगरी समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होत असताना, या प्रकरणात आता आगरी–कोळी समाज आक्रमक झाला आहे.

या प्रकरणात महत्त्वाचं म्हणजे, ज्याला फोन केला तो व्यक्ती आणि ज्याला शिवीगाळ करण्यात आली तो व्यक्ती – हे दोघेही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी उपस्थित होते. दोघांनीही ही ऑडिओ क्लिप खरी असल्याचा दावा करत, आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून मिनाक्षी शिंदे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये एका कार्यकर्त्याला फोन करून धमकावल्याचा आणि आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ही क्लिप समोर आल्यानंतर आगरी–कोळी समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, याचे पडसाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत.
कापुरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार
या प्रकरणानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि आगरी–कोळी समाजाचे अध्यक्ष सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे हे समाजातील कार्यकर्त्यांसह कापुरबावडी पोलीस ठाण्यात दाखल झाले. मिनाक्षी शिंदे यांच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल
ठाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत तक्रारी देणार असल्याची घोषणा खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी सांगितलं की, शनिवारी ठाण्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात मिनाक्षी शिंदेंविरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे.
ऑडिओ क्लिप खरी की खोटी?
या प्रकरणात दोन टोकाची मतं समोर आली आहेत. ज्याला कॉल केला तो व्यक्ती ज्याला शिवीगाळ झाली तो व्यक्ती दोघांनीही “ऑडिओ क्लिप खरी आहे” असा दावा केला जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली
मिनाक्षी शिंदेंचा दावा
ही ऑडिओ क्लिप खोटी आहे AI (Artificial Intelligence) च्या माध्यमातून क्लिप तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनीही याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
बाळ्या मामा म्हात्रेंचा थेट इशारा
खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी या प्रकरणावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ही ऑडिओ क्लिप फक्त ठाणे जिल्ह्यात नाही, तर रायगड आणि पालघर जिल्ह्यातही फिरत आहे. यावर चर्चा करतानाही लाज वाटते. निवडणूक आहे, आचारसंहिता आहे, लोकशाही आहे. लोकांना निर्भीडपणे मतदान करता आलं पाहिजे.
हेही वाचा: लाडकी बहीण योजना : 3000 रुपयांचा हप्ता मिळणार की पुढे जाणार? अजित पवारांचे मोठे विधान
ते पुढे म्हणाले, सरळ घरात घुसून मारू, पोरं पाठवू अशी धमकी दिली जाते. तेवढ्यावरच न थांबता आमच्या समाजाविषयी अपमानास्पद भाषा वापरली जाते. आमच्या समाजाची ताकद पाहण्याची तयारी ठेवा.”
निवडणूक आचारसंहिता आणि संभाव्य आंदोलन
बाळ्या मामा यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितलं की, आम्ही निवडणूक आयोगाचा सन्मान करतो कायद्याचं पालन करत आहोत अन्यथा ठाणे जिल्ह्यात लाख–दीड लाख लोकांचा मोर्चा निघाला असता “पुन्हा आमच्या समाजाविषयी बोलण्याची हिंमत करू नका,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
पुढे काय होणार?
पोलीस तपासातून ऑडिओ क्लिपची सत्यता तपासली जाणार
AI द्वारे बनावट क्लिप आहे की प्रत्यक्ष संभाषण, याचा तांत्रिक अहवाल महत्त्वाचा
निवडणुकीच्या तोंडावर प्रकरण तापल्याने राजकीय परिणाम होण्याची शक्यता

1 कमेंट