Tuesday, 13 October 2026
राजकारण

Exit Poll Bmc Election 2026: 25 वर्षांच्या सत्तेला धक्का? मुंबईचा सर्वात चर्चेतला एक्झिट पोल समोर

लेखक: aniketpatil1888 January 15, 2026 1 min read 1 कमेंट

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांचं लक्ष एक्झिट पोलकडे लागलं आहे. विविध संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार, यंदाच्या निवडणुकीत सत्तासमीकरण मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक अंदाजांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला स्पष्ट आघाडी मिळताना दिसत असून, गेल्या 25 वर्षांपासून महापालिकेवर वर्चस्व असलेल्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत.

Exit Poll Bmc Election 2026

मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडलं असून, अधिकृत निकाल 16 जानेवारीला जाहीर होणार आहे. मात्र त्याआधीच समोर आलेल्या एक्झिट पोलमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जनमत Exit Poll काय सांगतो?

जनमत या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार, भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. या एक्झिट पोलनुसार महायुतीला सुमारे 138 जागा मिळू शकतात. दुसरीकडे ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला मिळून सुमारे 62 जागांवरच समाधान मानावं लागू शकतं.

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला सुमारे 20 जागा, तर इतर पक्षांना अंदाजे 7 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

JVC Exit Poll : भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर?

JVC या संस्थेच्या एक्झिट पोलमध्येही मुंबईत भाजप-शिंदे युतीला मोठं यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार,

  • भाजप-शिंदे गट : 138 जागा
  • ठाकरे गट-मनसे : 59 जागा
  • काँग्रेस-वंचित : 23 जागा
  • इतर : 7 जागा

मतांच्या टक्केवारीबाबत बोलायचं झाल्यास, महायुतीला सुमारे 42 ते 45 टक्के, ठाकरे-मनसे आघाडीला 34 ते 37 टक्के, तर काँग्रेस-वंचितला 13 ते 15 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

लोकशाही – रुद्र रिसर्च Exit Poll

लोकशाही आणि रुद्र रिसर्च यांच्या संयुक्त एक्झिट पोलनुसार, भाजप आणि शिंदे गटाला सुमारे 121 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गट आणि मनसेच्या युतीला 71 जागा, काँग्रेस-वंचितला 25 जागा आणि इतर पक्षांना 10 जागा मिळू शकतात.

Axis My India Exit Poll

Axis My India च्या अंदाजानुसार महायुतीला 131 ते 151 जागा, ठाकरे-मनसे गटाला 58 ते 68 जागा, काँग्रेस-वंचितला 12 ते 16 जागा, तर इतरांना 6 ते 12 जागा मिळू शकतात.

हे वाचा: मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, व्हायरल क्लिपवरून मोठा वाद…

मतांच्या टक्केवारीतही महायुती आघाडीवर असल्याचं या सर्वेक्षणातून दिसत आहे.

JDS Exit Poll काय म्हणतो?

JDS संस्थेच्या एक्झिट पोलनुसार देखील भाजप-शिंदे युतीला 127 ते 154 जागांपर्यंत यश मिळण्याचा अंदाज आहे. ठाकरे-मनसे गटाला 44 ते 64, काँग्रेस-वंचितला 16 ते 25, तर इतर पक्षांना 9 ते 17 जागा मिळू शकतात.

1 कमेंट

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *