Tuesday, 13 October 2026
Latest News

आझाद मैदानात विमानतळ नामकरणासाठी संघर्ष आंदोलन सुरू | खासदार बाळ्यामामा उपस्थित

लेखक: aniketpatil1888 February 23, 2026 1 min read 0 कमेंट्स

आज सकाळी २३/०२/२०२६ रोजी सकाळी ९:00 वाजता मुंबईतील आझाद मैदानात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण वाद आणि निर्णयासाठी संघर्ष आंदोलनाचा थाटात प्रारंभ झाला आहे, या आंदोलनाला बाळ्या मामा यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली असून त्यांनी जोरदार आवाज उठवला.

संघर्ष आंदोलनाचे आयोजन “दि.बा. पाटील” हे नाव विमानतळाला देण्याबाबत निर्णय उशिरा होत असल्याने आणि स्थानिक समुदाय व राजकीय कार्यकर्त्यांचे प्रश्न अनुत्तरित असल्यामुळे करण्यात आले आहे. आझाद मैदानात सकाळी ९:०० ते सायं. ५:३० पर्यंत असणाऱ्या या आंदोलना कार्यक्रमात स्थानिक नेते, कार्यकर्ते, युवक, महिलांसह विविध संघटनांचा मोठा सहभाग दिसून आला.

बाळ्या मामा म्हणाले की, “नवी मुंबई विमानतळाचे नाव योग्य व्यक्तीच्या नावाने ठेवणे हे आदर व इतिहासासाठी आवश्यक आहे, आजही या निर्णयाबद्दल शंका आणि चर्चा सुरू असून यादरम्यान सरकारने पारदर्शक निर्णय घ्यावा.” स्थानिक समुदायाने देखील या आंदोलनाला समर्थन दर्शवले आणि निर्णय लवकर घेण्याची मागणी केली आहे. आंदोलनात उपस्थितांनी तिरंगा फडकावताहेत, घोषणाबाजी करताहेत आणि आपले आवाज एकत्रित करताहेत.

हेही वाचा: लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता खात्यात जमा | 1500 रुपये जमा सुरू

या आंदोलनामुळे सामाजिक आणि राजकीय चर्चेला नवीन उभारी मिळाली असून नागरिकांचे लक्ष विमानतळाच्या नामकरणाकडे वळले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनात कोणत्याही प्रकारची हिंसाचाराची घटना घडलेली नाही आणि सर्व सहभागी शांततेने आपले मत व्यक्त करत आहेत. कार्यक्रम संध्याकाळी सायं. ५:३० पर्यंत चालणार आहे, त्यानंतर पुढील निर्णय आणि पुढाकाराबद्दल अधिकृत माहिती येण्याची शक्यता आहे.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *