मेट्रो लाईन 8 ते समृद्धी महामार्ग! सरकारचे 3 धडाकेबाज निर्णय, महाराष्ट्र बदलणार…
राज्य सरकारने आज (27 जानेवारी) घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मेट्रो लाईन 8, समृद्धी महामार्गाचा विस्तार आणि नाशिक परिक्रमा मार्ग यासह तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, प्रकल्प रेंगाळू देऊ नका, वेळेत पूर्ण करा.
मेट्रो लाईन 8 ला मंजुरी, 3 वर्षांत पूर्ण करण्याचे आदेश
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) या महत्त्वाच्या मार्गावर मेट्रो लाईन 8 ला मंजुरी देण्यात आली आहे.
हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे थेट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
भूसंपादन आणि सर्व प्रशासकीय मंजुरी पुढील 6 महिन्यांत पूर्ण करा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
- 35 किमी लांबीचा मेट्रो मार्ग, 20 स्थानके
- मेट्रो लाईन 8 ची एकूण लांबी 35 किलोमीटर असणार आहे.
- 9.25 किमी भूमिगत मार्ग
- 24.636 किमी उन्नत मार्ग
या मार्गावर एकूण 20 स्थानके असतील.
6 भूमिगत
14 उन्नत
दोन स्थानकांमधील सरासरी अंतर 1.9 किमी असेल.
भूसंपादनासाठी 388 कोटी, एकूण खर्च 22,862 कोटी
- या प्रकल्पासाठी सुमारे 30.7 हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे.
- भूसंपादनाचा खर्च: 388 कोटी रुपये
- प्रकल्पाचा एकूण खर्च: 22,862 कोटी रुपये
CSMIA टर्मिनल 2 ते घाटकोपर पूर्व हा भाग भूमिगत असेल, तर घाटकोपर पश्चिम ते नवी मुंबई विमानतळ टर्मिनल 2 पर्यंतचा मार्ग उन्नत असेल.
समृद्धी महामार्गाचा विस्तार, विदर्भाला मोठा फायदा
फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया – भंडारा – गडचिरोलीपर्यंत करण्याच्या कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.
हा विस्तार झाल्यास —
औद्योगिक गुंतवणूक वाढणार
खनिज वाहतुकीला चालना
विदर्भातील विकासाला वेग मिळण्याची शक्यता आहे.
नाशिक शहर परिक्रमा मार्गालाही हिरवा कंदील
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्ग प्रकल्पालाही गती देण्यात आली आहे.
एकूण लांबी: 66.15 किमी
खर्च: 3,954 कोटी रुपये
याशिवाय नवेगाव मोरे – कोनसरी – मूळचेरा – हेदरी – सुरजागड हा 85.76 किमीचा चार पदरी सिमेंट-काँक्रिट महामार्ग मंजूर करण्यात आला आहे.
