Tuesday, 13 October 2026
Latest News

Ladki Bahin Yojana Update 2026: ई-केवायसी दुरुस्तीसाठी पोर्टल सुरू, 31 मार्चपर्यंत संधी

लेखक: aniketpatil1888 February 6, 2026 1 min read 0 कमेंट्स

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, ई-केवायसी दुरुस्तीसाठी पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आता महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत अर्जातील चुका दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे.

ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका आता दुरुस्त करता येणार

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र, ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान अनेक लाभार्थी महिलांकडून तांत्रिक चुका झाल्यामुळे त्यांचे हप्ते थांबले होते. विशेषतः कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत नसल्याचा पर्याय निवडताना चुकीची माहिती भरल्याने अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते.

या समस्येमुळे राज्यभर महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे देखील काढण्यात आले होते. याची दखल घेत शासनाने महिलांना मोठा दिलासा देत पोर्टल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पात्र महिलांना पुन्हा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

महिला व बालविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश दिल्यानंतर आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ज्या महिलांनी अर्ज करताना चुकीची माहिती भरली होती त्या महिलांना आता —

  • अर्जामध्ये सुधारणा
  • पुन्हा पात्रता तपासणी
  • थांबलेले हप्ते मिळण्याची संधी मिळणार आहे.

हप्त्यांबाबत महिलांची प्रतीक्षा कायम

दरम्यान, डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता राज्यातील कोट्यवधी महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.

हे वाचा: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर 32 तास कोंडी, टोल परत द्या – राज ठाकरेंची सरकारवर थेट मागणी

यासोबतच सरकारने निवडणुकीपूर्वी या योजनेतील मानधन 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे महिलांचे लक्ष लागले आहे.

महिलांनी काय करावे?

जर तुमचा अर्ज अपात्र ठरला असेल तर

  • अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा
  • https://ladakibahin.maharashtra.gov.in/
  • ई-केवायसी तपासा
  • चुकीची माहिती दुरुस्त करा
  • 31 मार्च 2026 पूर्वी प्रक्रिया पूर्ण करा

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *