Tuesday, 13 October 2026
नोकरी

Google मध्ये नोकरी कशी मिळवायची? कोणती डिग्री लागते, किती मिळतो पगार? संपूर्ण माहिती

लेखक: aniketpatil1888 January 29, 2026 1 min read 0 कमेंट्स

आजच्या तरुणांचा ड्रीम जॉब कोणता असेल तर त्यात Google (गुगल) हे नाव हमखास येतं. गलेलठ्ठ पगार, जगभरात काम करण्याची संधी, आधुनिक ऑफिस, मोकळं वर्क कल्चर आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीमुळे गुगलमध्ये काम करणं हे अनेकांचं स्वप्न आहे.

दरवर्षी भारतासह जगभरातून 30 लाखांहून अधिक उमेदवार Google मध्ये नोकरीसाठी अर्ज करतात. मात्र यातील 1 टक्क्यांहूनही कमी लोकांची निवड होते. त्यामुळे गुगलमध्ये नोकरी मिळवणं कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही.

Google मध्ये नोकरीसाठी कोणती डिग्री लागते?

गुगलमध्ये नोकरीसाठी फक्त डिग्रीपेक्षा कौशल्यांना जास्त महत्त्व दिलं जातं. तरीही काही शैक्षणिक पात्रता प्राधान्याने पाहिली जाते.

Preferred Degree:

  • B.E. / B.Tech (Computer Science / IT)
  • MCA (Master of Computer Applications)
  • B.Sc / M.Sc (Computer Science)
  • Data Science, AI, ML संबंधित पदव्या

मात्र Google तुमचं:

  • लॉजिकल थिंकिंग
  • Problem Solving Ability
  • Creativity
  • Real-world Projects

कोणती Skills असणं गरजेचं आहे?

Google मध्ये सिलेक्शनसाठी खालील कौशल्ये फार महत्त्वाची ठरतात:

  • Programming Languages: Python, Java, C++, JavaScript
  • Data Structures & Algorithms
  • System Design
  • AI, Machine Learning, Cloud Computing
  • Communication & Teamwork Skills

डिग्री नसली तरी strong skills + projects असतील तर Google मध्ये संधी मिळू शकते.

📝 Google Job Selection Process कशी असते?

1️⃣ Online Apply

Google Careers वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
Resume मध्ये projects, internships, certifications स्पष्ट लिहावीत.

👉 Google employee referral मिळाल्यास संधी वाढते.

2️⃣ HR Screening

HR तुमच्याशी फोन किंवा व्हिडिओ कॉलवर संपर्क साधतो.
करिअर, अनुभव, Google मध्ये काम का करायचं यावर चर्चा होते.

3️⃣ Online Test / Assignment

Coding Test

Case Study

Mini Project

यातून तुमची analytical क्षमता तपासली जाते.

4️⃣ Technical Interview

हा सर्वात महत्त्वाचा टप्पा.

3 ते 5 मुलाखती

प्रत्येकी 45–60 मिनिटे

Coding, DSA, System Design प्रश्न

5️⃣ Googleyness Interview

इथे तुमचं व्यक्तिमत्व तपासलं जातं.

Team player आहात का?

Pressure handle करता का?

Ethical decision making

6️⃣ Final Committee & Offer Letter

सर्व रिपोर्ट्स पाहून अंतिम समिती निर्णय घेते.
निवड झाल्यास Offer Letter दिलं जातं.

संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला साधारण 6 ते 8 आठवडे लागतात.

हे वाचा: Budget 2026: यंदाच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळणार? 

Google मध्ये किती पगार मिळतो?

Freshers साठी:

₹15 लाख ते ₹40 लाख वार्षिक (CTC)

Monthly In-hand: ₹50,000 ते ₹1,00,000+

Experienced Engineers:

₹60 लाख ते ₹1 कोटी+ वार्षिक

Extra Benefits:

Free meals 🍱

Health insurance

Stock options (RSU)

Paid leaves & travel benefits

भारतात Google चे ऑफिस कुठे आहेत?

  • Bengaluru
  • Hyderabad
  • Mumbai
  • Gurugram
  • Pune

Hybrid आणि Remote Work ची सुविधा देखील काही पदांसाठी उपलब्ध आहे. Google मध्ये नोकरी मिळवणं अवघड आहे, पण योग्य तयारी, मजबूत skills आणि सातत्य असेल तर हे स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकतं. डिग्रीपेक्षा तुमचं ज्ञान, विचार करण्याची पद्धत आणि problem solving skill Google जास्त पाहतो.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *