Tuesday, 13 October 2026
मनोरंजन

कुरळे ब्रदर्सचा कडक नियम धुळीस! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मध्ये रिंकू राजगुरूचा धमाका

लेखक: aniketpatil1888 January 12, 2026 1 min read 1 कमेंट

कुरळे ब्रदर्ससाठी आयुष्य म्हणजे नियम, शिस्त आणि एक ठाम तत्त्व — ‘नो लेडीज, नो मॅरेज’. स्त्रियांना आयुष्यात अजिबात स्थान नाही, असा कडक नियम पाळणाऱ्या या भावंडांच्या आयुष्यात जर एका बिनधास्त मुलीची एंट्री झाली, तर काय होईल?

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये याच गोंधळाची झलक पाहायला मिळते. रतन, मदन, चंदन आणि बबन यांच्या शिस्तबद्ध आयुष्यात कामिनी नावाची मुलगी दाखल झाली असून तिच्या येण्याने सगळे नियम हादरले आहेत.

कामिनीची एंट्री म्हणजे डबल गोंधळ!

कामिनीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू या चित्रपटातून कुरळे ब्रदर्सच्या गँगमध्ये सामील झाली आहे.
कठोर स्वभावाचा रतन, विनोदी मदन, निरागस चंदन आणि खट्याळ बबन — या सगळ्यांमध्ये बिनधास्त कामिनी मिसळली की गोंधळ आणि विनोदाची आतषबाजी ठरलेलीच!

टीझरमध्ये कामिनीच्या येण्याने उडणारी तारांबळ, मजेशीर प्रसंग आणि भन्नाट संवादांची झलक पाहायला मिळतेय.

रिंकू राजगुरू काय म्हणते?

रिंकू राजगुरू म्हणते,

हे वाचा: 17 स्पर्धक, 100 दिवस आणि एक ट्रॉफी! Bigg Boss Marathi Season 6 ची धमाकेदार सुरुवात

“‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’सारख्या लोकप्रिय चित्रपटाच्या सीक्वेलचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास आहे. अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं.”

दिग्गज कलाकारांची फौज

या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार —

  • अशोक सराफ
  • भरत जाधव
  • मकरंद अनासपुरे
  • सिद्धार्थ जाधव
  • रिंकू राजगुरू
  • संकेत पाठक
  • संजय नार्वेकर
  • समृद्धी केळकर
  • दिग्दर्शन: अंकुश चौधरी
  • कथा: अंकुश चौधरी
  • पटकथा व संवाद: संदीप दंडवते

1 कमेंट

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *