Tuesday, 13 October 2026
मनोरंजन

मी गप्प बसणार नाही – स्मृती मानधनाच्या मित्राच्या तक्रारीनंतर पलाश मुच्छल आक्रमक, थेट कायदेशीर इशारा

लेखक: aniketpatil1888 January 23, 2026 1 min read 0 कमेंट्स

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाचा विषय शांत होत नाही तोच आता पलाश मुच्छल नव्या वादात अडकला आहे. स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने याने पलाश मुच्छल यांच्या विरोधात 40 लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीची तक्रार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाखल केली आहे.

या तक्रारीनंतर आता पलाश मुच्छलने आपले मौन सोडत पहिल्यांदाच सार्वजनिक प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. यासोबतच पलाशने संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाईचा गंभीर इशारा दिला आहे.

नेमके आरोप काय आहेत?

विज्ञान माने याने दिलेल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की,

  • पलाश मुच्छलने चित्रपटात काम देण्याचे आश्वासन दिले
  • 40 लाख रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप
  • मात्र त्यानंतर कोणतेही काम न देता आर्थिक फसवणूक केली

या प्रकरणात विज्ञान माने याने पलाश मुच्छल आणि त्यांच्या आईवरही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. सध्या ही तक्रार पोलिसांकडे असून गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

पलाश मुच्छल काय म्हणाला?

या सर्व आरोपांवर पलाश मुच्छलने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. पलाशने आपल्या स्टोरीमध्ये स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की,

सांगलीच्या विज्ञान माने याने माझ्यावर केलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहेत. हा माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे हे प्रकरण मी सोडून देणार नाही. यासोबतच पलाशने सांगितले की, माझे वकील श्रेयांश मितारे हे संपूर्ण प्रकरण हाताळत आहेत. आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करून योग्य उत्तर देऊ.

हे वाचा: कुरळे ब्रदर्सचा कडक नियम धुळीस! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मध्ये रिंकू राजगुरूचा धमाका

काही महिन्यांपूर्वी स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न ऐन मांडवात मोडल्याची बातमी समोर आली होती. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे लग्न रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर स्मृतीने सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली होती.

आता या नव्या वादामुळे पलाश मुच्छल पुन्हा एकदा चर्चेत आला असून हे प्रकरण पुढे कायदेशीर वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *