Tuesday, 13 October 2026
बिझनेस

क्रिप्टो ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता लोकेशन ट्रॅक, लाईव्ह सेल्फी बंधनकारक

लेखक: aniketpatil1888 January 11, 2026 1 min read 0 कमेंट्स

भारतामध्ये बिटकॉइन, इथेरियम आणि इतर क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकारच्या Financial Intelligence Unit (FIU) ने देशातील सर्व क्रिप्टो एक्सचेंजसाठी नवीन आणि कठोर नियम लागू केले आहेत.

Crypto Trading Alert: भारतात क्रिप्टो एक्सचेंजसाठी सरकारचे नवे कडक नियम लागू

या नव्या नियमांनुसार आता लाइव्ह सेल्फी, जिओ-टॅगिंग, बँक अकाउंटची काटेकोर पडताळणी यासारख्या प्रक्रिया अनिवार्य करण्यात आल्या आहेत. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे -मनी लॉन्ड्रिंग, सायबर फसवणूक आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर आळा घालणे.

क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये नेमकं काय बदललं? (5 मोठे नियम)

1 .Live Selfie आता बंधनकारक

आतापर्यंत फोटो अपलोड करून KYC पूर्ण होत होती. मात्र आता लाइव्ह सेल्फी द्यावी लागणार आहे.
सिस्टम वापरकर्त्याला पलक झपकवणे, मान हलवणे यासारख्या हालचाली करायला सांगेल.
Deepfake आणि बनावट ओळख वापरून होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी हा नियम आणला आहे.

2. Geo-Tagging: लोकेशन ट्रॅक होणार

क्रिप्टो अकाउंट उघडताना किंवा व्यवहार करताना वापरकर्त्याची जिओ-लोकेशन नोंदवली जाईल.
यामध्ये:

Latitude – Longitude

IP Address

देश आणि राज्याची माहिती

ही सगळी माहिती एक्सचेंजकडे सुरक्षित ठेवली जाणार आहे.

3. बँक अकाउंटसाठी Penny Drop Verification

फक्त बँक तपशील देणं पुरेसं राहणार नाही.
आता 1 रुपयाचा ट्रान्झॅक्शन (Penny Drop) करून खाते तुमचंच आहे, याची खात्री केली जाईल.
???? यामुळे बनावट बँक खात्यांचा वापर थांबवण्याचा प्रयत्न आहे.

4. दोन सरकारी ओळखपत्रे अनिवार्य

आता फक्त PAN Card चालणार नाही.
PAN सोबत खालीलपैकी एक आयडी देणं बंधनकारक:

आधार कार्ड

पासपोर्ट

मतदान ओळखपत्र

यामुळे KYC प्रक्रिया अधिक मजबूत होणार आहे.

5. Email + Mobile OTP Verification

क्रिप्टो अकाउंटसाठी:

ईमेल OTP

मोबाइल OTP

दोन्ही वेगवेगळे वेरिफिकेशन आता आवश्यक असणार आहे.

सरकारने इतके कडक नियम का आणले?

FIU ने क्रिप्टो एक्सचेंजना आता Virtual Digital Asset (VDA) Service Provider म्हणून वर्गीकृत केलं आहे.
यामागील प्रमुख कारणे:

मनी लॉन्ड्रिंग

टेरर फंडिंग

सायबर क्राईम

फेक अकाउंट्सद्वारे होणारे व्यवहार

या सगळ्यांवर नियंत्रण ठेवणं.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *