महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे विविध विभागांमध्ये एकूण 87 पदे भरली जाणार आहेत. राज्य शासनाच्या उच्च दर्जाच्या सेवांमध्ये अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे.

ही भरती सामान्य प्रशासन विभाग तसेच महसूल व वन विभाग अंतर्गत होणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
MPSC Civil Services Bharti 2026 भरतीची थोडक्यात माहिती
- संस्था: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
- जाहिरात क्रमांक: 132/2025
- एकूण पदे: 87
- परीक्षेचे नाव: महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026
- नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज पद्धत: Online
- परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
पदांचे नाव आणि पदसंख्या
| पद क्र. | विभाग | संवर्ग | पदसंख्या |
|---|---|---|---|
| 1 | सामान्य प्रशासन विभाग | राज्य सेवा गट-अ व गट-ब | 79 |
| 2 | महसूल व वन विभाग | महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा गट-अ व गट-ब | 08 |
| एकूण | 87 |
शैक्षणिक पात्रता
| संवर्ग / पद | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ | 55% गुणांसह B.Com किंवा CA किंवा M.Com किंवा MBA |
| उद्योग अधिकारी, तांत्रिक, गट-ब | इंजिनिअरिंग पदवी (सिव्हिल व्यतिरिक्त) किंवा B.Sc |
| पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ | पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंवर्धन विषयातील पदवी |
| उर्वरित इतर संवर्ग | कोणत्याही शाखेतील पदवी |
वयोमर्यादा
मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ उमेदवारांना 5 वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
| संवर्ग | वयोमर्यादा |
|---|---|
| उद्योग अधिकारी, तांत्रिक, गट-ब | 20 जानेवारी 2026 रोजी 18/19 ते 38 वर्षे |
| इतर सर्व संवर्ग | 01 एप्रिल 2026 रोजी 18/19 ते 38 वर्षे |
हेही वाचा: कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 132 जागांसाठी भरती
अर्ज शुल्क
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| खुला प्रवर्ग | ₹544/- |
| मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग | ₹344/- |
महत्त्वाच्या तारखा
- Online अर्ज सुरू: 31 डिसेंबर 2025
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2026 (रात्री 11:59 पर्यंत)
- पूर्व परीक्षा: 31 मे 2026
अर्ज कसा करायचा
उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी आणि आवश्यक कागदपत्रे योग्य स्वरूपात अपलोड करावीत.
महत्वाच्या लिंक्स
| लिंकचे नाव | लिंक |
|---|---|
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
MPSC Civil Services Bharti 2026 ही महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित सेवांमध्ये अधिकारी होण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने करून शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
