Saturday, 24 October 2026
क्रीडा

IND vs NZ 1st ODI: हर्षित राणाच्या दमावर भारताचा विजय, मालिकेत 1-0 आघाडी

लेखक: aniketpatil1888 January 11, 2026 1 min read 0 कमेंट्स

टीम इंडियाने 2026 या नववर्षाची सुरुवात दणदणीत विजयाने करत न्यूझीलंडविरुद्ध आपली दबदबा कायम ठेवली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात केली. या विजयासह भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सलग आठवा एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 301 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 49 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 306 धावा करत सामना 6 चेंडू राखून जिंकला. विशेष म्हणजे, 2025 पासून न्यूझीलंडविरुद्ध भारताने जिंकलेले सर्व आठ सामने हे यशस्वी धावांचा पाठलाग करत जिंकले आहेत.

विराट–गिलची दमदार भागीदारी, पण सामना फिरवला हर्षित राणाने

या आव्हानात्मक धावसंख्येच्या पाठलागात भारताची सुरुवात सकारात्मक झाली. रोहित शर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत संघाला वेग दिला. 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने त्याने 26 धावांची खेळी केली.

यानंतर विराट कोहली आणि कर्णधार शुबमन गिल यांनी डाव सावरत शानदार भागीदारी रचली. विराटचे शतक काही धावांनी हुकले, तर गिलने अर्धशतक झळकावत डाव स्थिर केला. मात्र दोघे बाद झाल्यानंतर भारताचा डाव पुन्हा अडचणीत सापडला.

निर्णायक क्षणी हर्षित राणा – सामन्याचा खरा हिरो

सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट ठरला तो हर्षित राणा आणि केएल राहुल यांची शांत पण प्रभावी भागीदारी. दोघांनी प्रत्येकी 29 धावा करत भारताचा विजय निश्चित केला.

हे वाचा: गुजरात जायंट्सचा दमदार विजय, UP Warriorz ला 10 रनांनी पराभव

हर्षित राणाने केवळ फलंदाजीतच नाही, तर गोलंदाजीतही प्रभाव पाडत 2 महत्त्वाचे बळी घेतले. त्यामुळे सामन्यातील त्याचा ऑलराउंड परफॉर्मन्स निर्णायक ठरला आणि तोच या विजयाचा नायक ठरला.

न्यूझीलंड: 300/8 (50 ओव्हर)

भारत: 306/6 (49 ओव्हर)

निकाल: भारताचा 4 विकेट्सने विजय

मालिका स्थिती: भारत 1–0 ने पुढे

या विजयासह भारताने न्यूझीलंडविरुद्धचा मानसिक वरचष्मा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. नववर्षात मिळालेला हा विजय संघाच्या आत्मविश्वासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पुढील सामन्यांत भारत ही विजयी लय कायम ठेवतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *