IND vs SL: भारताने श्रीलंकेला 72 धावांनी धूळ चारली; विक्रमी आठव्यांदा Asia Cup वर कब्जा
भारताने प्रथम फलंदाजी करताना 183/5 धावा केल्या. शेफाली वर्माने 68 धावा आणि स्मृती मंधानाने 59 धावा करत पहिल्या विकेटसाठी तब्बल 129 धावांची भागीदारी केली. शेफालीने अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि महिला आशिया कपच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम केला.

श्रीलंकेला 184 धावांचे लक्ष्य मिळाले होते मात्र भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा डाव 111 धावांवर आटोपला. श्री चारणीने शानदार गोलंदाजी करत 4 विकेट घेतल्या तर दीप्ती शर्मानेही महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने तब्बल 72 धावांनी विजय मिळवत 2026 चा Women’s Asia Cup जिंकला. या विजयामुळे भारताने Women’s Asia Cup मध्ये आपले वर्चस्व आणखी मजबूत केले आहे. 2024 मध्ये श्रीलंकेकडून अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताने यावेळी त्याच संघाला अंतिम सामन्यात हरवत विजेतेपद पटकावले.
Nepal vs UAE: नेपाळचा दणदणीत विजय; UAE ला 44 धावांनी हरवत आशिया कपचे तिकीट पक्के
महिला आशिया कप 2026 च्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा तब्बल 72 धावांनी पराभव करत विक्रमी आठव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले. दुबईत झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 विकेट गमावून 183 धावा केल्या. शेफाली वर्माने 68 तर स्मृती मंधानाने 59 धावांची शानदार खेळी केली. दोघींमध्ये 129 धावांची जबरदस्त सलामी भागीदारी झाली. 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 20 षटकांत 111 धावांवर ऑलआउट झाला. भारताकडून श्री चरणीने 4 विकेट घेतल्या तर दीप्ती शर्माने 3 विकेट घेत श्रीलंकेच्या फलंदाजीला मोठा धक्का दिला. या विजयासह भारताने 2024 च्या फायनलमध्ये श्रीलंकेकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला.
