सलमान खान हा माफी मागेल, त्यावेळी हा वाद आमच्यासाठी संपेल- लॉरेन्स बिश्नोई

Salman Khan : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. सलमान खान याच्या सुरक्षेमध्येही मोठी वाढ करण्यात आलीये. सलमान खानच्या घरावर पहाटे आज गोळीबार करण्यात आलाय.

रविवारी पहाटे पाच वाजता सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारनंतर मोठी खळबळ ही बघायला मिळाली. हेच नाही तर दोन दिवसांपूर्वी ईदच्या दिवशी ज्या गॅलरीत उभे राहून सलमान खान चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसला त्याच गॅलरीच्या आसपास हा गोळीबार करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे एक गोळी ही घरात गेल्याचे काही रिपोर्टनुसार सांगण्यात आलंय. तब्बल पाच गोळ्या सलमान खानच्या घरावर झाडण्यात आल्याचे देखील सांगितले जातंय. या प्रकरणातील तपास देखील सुरू करण्यात आलाय.

आता या प्रकरणात मोठे खुलासे होताना दिसत आहेत. सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्याचे समजताच लॉरेन्स बिश्नोई हे नाव चर्चेत आले. गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई हा सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये लॉरेन्स बिश्नोई याने याबद्दल थेट भाष्य केले होते. लॉरेन्स बिश्नोई हा म्हणाला होता की, मी अजून गँगस्टरच झालो नाहीये. आता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई याच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

सलमान खान हा माफी मागेल

लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या केलीये. आता लॉरेन्स बिश्नोईच्या भावानेच सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी ही घेतलीये. त्यावेळी लॉरेन्स बिश्नोई याने स्पष्ट केले होते की, ज्यावेळी सलमान खान हा माफी मागेल, त्यावेळी हा वाद आमच्यासाठी संपेल.

हेही वाचा : भारत दहशतवाद रोखण्यासाठी सहकार्य करण्यास तयार आहे – राजनाथ सिंहने पाकिस्तानला दिला इशारा

हेच नाही तर सलमान खानला बीकानेरच्या मंदिरात जाऊन माफी मागायला लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून सांगण्यात आले. हेच नाही तर लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान आणि सिद्धू मुसेवाला हे अहंकारी असल्याचे देखील म्हटले होते. काही दिवसांपूर्वी मेल करूनही सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आली होती.

सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने त्याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये. मात्र, असे असतानाही त्याच्या घरावर गोळीबार झालाय. ज्यावेळी पहाटे हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. आता या प्रकरणात पोलिसांकडून काही मोठे खुलासे हे केले जाऊ शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आई एकविरा माता पालखी सोहळ्या निमित्त गडावर भाविकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन….

Sun Apr 14 , 2024
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला कार्ल्यात सुरुवात झाली आहे. नवसाला पावणारी आई एकवीरा पालखी निमित्त गडावर भाविकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन […]
आई एकविरा माता पालखी सोहळ्या निमित्त गडावर भाविकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन….

एक नजर बातम्यांवर