आई एकविरा माता पालखी सोहळ्या निमित्त गडावर भाविकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन….

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला कार्ल्यात सुरुवात झाली आहे. नवसाला पावणारी आई एकवीरा पालखी निमित्त गडावर भाविकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

उद्या दि 15 एप्रिल 2024 रोजी आई आई एकविरा माता पालखीची गडावर सुरुवात होणार आहे. एकविरा मातेच्या कृपा आशीर्वादाने, भाविकां प्रती असलेल्या कर्तव्य भावनेतून आई एकविरा प्रतिष्ठान संतुक्त आगरी कोळी मेडिकोज दोन्ही संस्थां द्वारे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा एकविरा मातेच्या पालखी सोहळ्या निमित्ताने येणाऱ्या भक्तांसाठी प्रथमोपचार वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे.

तसेच सदर शिबिर हे दिनांक 14/04/2024 आणि 15/04/2024 रोजी कार्यरत असणार आहे . या उपक्रमात दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, महिला तसेच सर्व भाविकांना आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. तरीही सर्व भाविकांनी आपल्या प्रथमोपचार आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा.

हेही वाचा: जर तुम्हाला स्वामी तुमच्या पाठीशी हवे असतील तर ‘बाला’ हे १० चांगले विचार नक्की वाचा…हेही वाचा

आज आई एकविरा देवीच्या माहेरघरात भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा रंगनार आहे. मुंबई, रायगड, कोकण, तळकोकण भागातून आलेल्या आई एकविरा देवीच्या पालख्या याठिकाणी भाऊ काळभैरवनाथाची भेट घेण्यासाठी आल्या आहेत. आणि उद्या आई एकवीरा देवीची पालखी सोहळा पार पाडण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सचा 8 विकेट्सनी पराभूत

Sun Apr 14 , 2024
28 व्या आयपीएल सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात लखनौचा कोलकाताकडून पराभव झाला. विजयासाठी 162 धावा करताना दोन […]
Kolkata Knight Riders beat Lucknow Super Giants by 8 wickets

एक नजर बातम्यांवर