Mahavikas Aghadi ‘Jode Maro’ Andolan: छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची शान आहेत, आणि त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
मुंबई : 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या पुतळा कोसळल्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. महाविकास आघाडी आज मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन सुरू करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
छत्रपती शिवरायांच्या नावाची घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची शान आणि तसेच त्यांना संपूर्ण महाराष्ट्र देव समजत आहे, त्यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही, असे म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा घोषणा देण्यात येत आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष करत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाकडे रवाना झाले आहेत.
हेही वाचा: लाडक्या बहिणी सोबत आता लाडक्या लेकीचा देखील फायदा होईल, नवीन “लेक लाडकी” योजना जाणून घ्या..
या मोर्चाला पोलिसांनी यापूर्वी परवानगी दिली नव्हती. पण आज रविवार आहे. या भागातील कार्यालये बंद आहेत. आमच्या आंदोलनाला परवानगी का नाही? असा सवाल महाविकास आघाडीने केला. त्यानंतर हा मोर्चा थांबणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. बॅरिकेड्सही हटवण्यात आले आहेत. हा मोर्चा आता गेट वे ऑफ इंडियाकडे रवाना झाला आहे.आणि त्यामध्ये आमच्यावर कशी कारवाई करतात ते बघायचे आहे त्यामुळे आता ह्या सरकारचा आम्ही निषेध करत आहे.