Reel बनवून महिन्याला लाखो कमाई! Instagram Reel Stars ची खरी कमाई उघड…
आज सोशल मीडियाचा जमाना आहे आणि त्यात Instagram हे सर्वात वेगाने वाढणारं व्यासपीठ बनलं आहे. काही वर्षांपूर्वी फक्त फोटो शेअर करण्यापुरतं मर्यादित असलेलं Instagram आज लोकांसाठी पूर्णवेळ करिअरचं साधन बनलं आहे.

Instagram Reels मुळे अनेक तरुण-तरुणींनी नोकरी सोडून कंटेंट क्रिएशनकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. पण अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो
- Instagram Reel बनवून खरंच पैसे मिळतात का?
- रील्सवर किती views आले की पैसे मिळायला लागतात?
- मोठे Reel Stars दरमहा किती कमावतात?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
Instagram रील्सवर थेट पैसे मिळतात का?
सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. भारतामध्ये Instagram views साठी थेट पैसे देत नाही. म्हणजेच YouTube प्रमाणे “इतके views = इतके पैसे” असं इथे गणित नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की Instagram वर पैसे कमावता येत नाहीत. उलट, योग्य पद्धतीने काम केल्यास Instagram हे मोठं कमाईचं साधन ठरू शकतं.
मग Instagram Reel Stars पैसे कुठून कमावतात?
Instagram Reel Stars ची कमाई प्रामुख्याने खालील मार्गांनी होते –
Brand Promotion
मोठ्या आणि छोट्या कंपन्या त्यांच्या प्रोडक्टचा प्रचार करण्यासाठी Reel Creators ला पैसे देतात.
Paid Collaboration
एका रीलसाठी हजारो ते लाखो रुपये मिळू शकतात.
हे वाचा: WhatsApp मध्ये येतोय पालकांसाठी जबरदस्त फीचर, मुलांच्या अकाउंटवर राहणार नियंत्रण
Affiliate Marketing
प्रोडक्टची लिंक शेअर करून विक्री झाली की कमिशन मिळतं.
Live Gifts & Badges
Live video दरम्यान followers कडून gifts मिळतात.
Followers नुसार अंदाजे महिन्याची कमाई
Instagram वर कमाई ही फक्त followers वर नाही, तर reach आणि engagement वर अवलंबून असते. तरीही साधारण अंदाज असा –
10 हजार Followers
₹10,000 ते ₹30,000 दरमहा
50 हजार Followers
₹50,000 ते ₹1.5 लाख दरमहा
1 लाख Followers
₹2 लाख ते ₹10 लाख दरमहा
5 लाख ते 10 लाख Followers
₹10 लाख ते 50 लाखांपर्यंत
1 मिलियन+ Followers
महिन्याला कोटींच्या घरात कमाई
कमी Followers असूनही कमाई शक्य आहे का?
होय, नक्कीच आजकाल brands followers पेक्षा niche आणि engagement बघतात. उदा.
Finance, Education, Health, Beauty, Travel अशा विषयांवर कंटेंट बनवणाऱ्या creators ला
कमी followers असूनही चांगली कमाई मिळते.
Instagram वर यशस्वी होण्यासाठी काय गरजेचं?
- Consistent content
- Unique idea
- Audience सोबत connection
- Fake followers टाळा
- Quality रील्सवर लक्ष द्या
Instagram वर पैसा viral होण्यामुळे नाही, तर लोकांचा तुमच्यावर विश्वास बसतो म्हणून येतो. योग्य कंटेंट, संयम आणि मेहनत असेल
तर Instagram Reels हे फक्त timepass न राहता. एक मजबूत करिअर ऑप्शन ठरू शकतं.
