21 April 2024

Batmya 24

Stay updated

भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे लाइव्ह स्ट्रीम केला जाईल?

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याची क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा आहे. भारत विरुद्ध इंग्लंड दुसरी कसोटी थेट लाईव्ह पहा. हा सामना कधी होणार आहे? सर्वकाही जाणून घ्या.

भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे लाइव्ह स्ट्रीम केला जाईल?

मुंबई: टीम इंडियाला पहिल्या कसोटीत आघाडीवर असतानाही पाहुण्या इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. हैदराबादमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लिश संघ आता पुन्हा सामन्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंड आपला विजयी मार्ग कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे पहिल्या कसोटी पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. हा दुसरा सामना कधी होणार? ते कोणते स्थान असेल? खेळ कधी सुरू होईल? चला जाणून घेऊया .

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया |

रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना हा टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना मोबाईलवर कुठे बघायला मिळेल?
दुसरा कसोटी सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपद्वारे पाहता येईल.

हे जाणून घ्या: BCCI Annual Awards 2023 Live Telecast| बीसीसीआयचा अवॉर्ड शो कुठे पाहू शकतो?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना केव्हा?
हा सामना 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना किती वाजता सुरु होणार?
दुसरा कसोटी सामना सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार. तर 9 वाजता टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना कुठे?
दुसरा कसोटी सामना हा डॉ वाय एस राजशेखर रेड्डी एसीए वीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन |

बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर),रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स एंडरसन.