16 April 2024

Batmya 24

Stay updated

Ajit Pawar : सरडा आपला रंग बदलतो, उपमुख्यमंत्री जरा सांभाळून, घार घिरट्या घालतेच आहे? शरद पवार गटाकडून अजित पवारांची थेट… जाणून घा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सरड्याशी उपमा दिली आहे. ही तुलना करण्यासाठी अजित पवार यांचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

Ajit Pawar Deputy Chief Minister is hovering around the house Ajit Pawar's direct from Sharad Pawar group

अजित पवार : शरद पवार गट आणि अजित पवार गटातील संघर्ष टोकाला गेला असून अजित पवार राष्ट्रवादी फोडून भाजपच्या मांडीवर बसले आहेत. अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव वाढला आहे. त्यामुळे अजित पवार सातत्याने टार्गेटवर आहेत, अजित पवार गटाकडून माजी व्यतिरिक्त शरद पवार गटालाही लक्ष्य केले जात आहे.

सरडा रंग बदलतो, उपमुख्यमंत्री जरा सांभाळून,

अजित पवारांच्या अडखळण्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आणि लगेचच सरपटणाऱ्या प्राण्याशी उपमा दिली. मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या व्हिडिओनुसार, सरडा त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्याचा रंग बदलतो, पण सारखा रंग बदलताना आपण आत्ता नक्की कुठे आहोत याचं भान मात्र त्याला राहत नाही. यामध्ये अजित पवार जित पवारांच्या तोंडातून महविकास आघाडीचं नाव येणं हा वेगळा राजकारण आहे . म्हणून घार घिरट्या घालतेच आहे, उपमुख्यमंत्री जरा सांभाळून असे ट्विट केले आहे .

हेही वाचा : भाजपने निवडणुकीवर 1092 कोटी आणि जाहिरातींवर 432 कोटी खर्च केले, निधीत 54% वाढ? जाणून घा….

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुती सरकार बोलताना अडखळले

आज 10 फेब्रुवारीला अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर होते . यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी महायुतीची सत्ता अडखळल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी थेट महाविकास आघाडीचे नाव घेतले. म्हणून तो व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करून त्याला सरपटणाऱ्या प्राण्याशी उपमा देण्यात आली आहे.

याउलट अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभेसाठी धाव घेतली. यावेळी ते बोलत असताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यानंतर विरोधी पक्षनेते जितेंद्र आवाड यांनी अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा निष्कर्ष काढला.