16 April 2024

Batmya 24

Stay updated

महाराष्ट्रातील नागरिकांना थेट पोलीस महासंचालकांशी संपर्क साधू शकतात; रश्मी शुक्ला यांनी मनापासून संवाद साधला.

Police mahasanchalak rashmi shukla | कोणत्याही राज्यातील रहिवाशांना त्रास होत असेल आणि संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांकडून न्याय मिळविता येत नसेल तर हा विषय पोलिस महासंचालक कार्यालयात आमच्या निदर्शनास आणून देण्यास सांगितले जाते.

महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला

मुंबई | राज्याचे पोलीस महासंचालक, दिनांक: 9 फेब्रुवारी 2024 रश्मी शुक्ला यांनी राज्यातील जनतेशी मनापासून संवाद साधला. यासाठी रश्मी शुक्ला यांनी पत्र तयार केले आहे. त्यात, राज्यातील कोणत्याही नागरिकाला वेदना होत असतील आणि संबंधित पोलिस कर्मचारी त्याला न्याय मिळवून देऊ शकत नसतील, अशा स्थितीत या प्रकरणाची पोलिस महासंचालक कार्यालयाला सूचना द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. परिणामी, राज्यातील लोक स्थानिक कायदेशीर व्यवस्थेबद्दल असमाधानी असल्यास महासंचालकांशी संपर्क साधण्याचा पर्याय आहे. महाराष्ट्र पोलिसांनी हे पत्र त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहे.

पत्रात काय लिहिले आहे

मी राज्य पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारून एक महिना झाला आहे. हे औचित्य साधत राज्याच्या सर्व पोलिसांच्या वतीने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि या अल्प कालावधीत मिळालेली शिकवण आणि पुढील वाटचालीच्या दृष्टीने माझे ध्येय तुमच्यासोबत शेअर करते.

महाराष्ट्र पोलीस दलातील समर्पित स्त्री-पुरुषांच्या बरोबरीने पुन्हा एकदा सेवा आणि संरक्षण करण्याच्या या विशेषाधिकाराबद्दल मी आधीच आभार व्यक्त करते. मी आतापर्यंत जे पाहिले आहे, अनुभवले आहे त्यावरून मला खात्री आहे की महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वोत्तम पोलीस दलांपेकी एक आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे. माझा विश्वास आहे की आम्ही सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पांठिबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे. पण या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक वाटते की काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलीस दलावरील विश्वास कमी झाला आहे. भूतकाळातील चुका मागे टाकून, तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की राज्यातील सर्व पोलीस तुकड्या तुमचे आणि तुमच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत आणि करत राहील

केंद्रीय पोलीस दलाचे नेतृत्व करताना मिळालेल्या अनमोल अनुभव गाठीशी घेऊन मी राज्यात परतले आहे. राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक आणि उच्च दर्जाच्या वागणुकीचे पालन करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. आम्ही पोलीस आणि जनता यांच्यातील पूल पुन्हा बांधू पोलीस दलातील कोणत्याही सदस्याकडून हिंसा, शोषण किंवा गैरवर्तनाची कोणतीही अन्यायकारक कृत्ये आमच्याकडून खपवून घेतली जाणार नाहीत. जर राज्यातील कोणत्याही नागरिकाला त्रास होत असेल आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांना न्याय मिळू शकत नसेल, तर ही गोष्ट पोलीस महासंचालक कार्यालयात आमच्या निदर्शनास आणून देण्याची मी विनंती करते. माझे सहकारी आणि मी तुम्हाला लवकरात लवकर मदत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू

आमचे पोलीस दल सुरक्षितता आणि परिणामकारकतेने त्यांची कर्तव्य पार पाडण्यासाठी आवश्यक संसाधने आणि प्रशिक्षणाने सुसज्ज आहेत. त्याची खात्री करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. डीजीपी या नात्याने दररोज आपला जीव धोक्यात घालणाऱ्या धाडसी पोलिसांना मी सर्वतोपरी पाठिंबा देईल.

हेही वाचा : न्यायालयीन सवलतीमुळे सार्वजनिक शाळांमध्ये भरती शक्य झाली, जी सध्याची सर्वात मोठी भरती आहे

आपल्यासमोर अनेक निरनिराळी आव्हाने आहेत आणि आपल्याला निश्चितच काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. पण मी तुम्हाला खात्री देते की माझ्या कार्यकाळात महाराष्ट्र पोलीस या आव्हानांना न डगमगता किंवा पक्षपातीपणा न ठेवता सामोरे जातील. या कार्यात आपण एकटे यशस्वी होऊ शकत नाही. या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला तुमचे सहकार्य आवश्यक आहे. त्या कालावधीत तुमच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मी तुमच्याशी थेट संपर्क साधण्यास उत्सुक आहे. तोपर्यंत आपण मला पाठिंबा द्यावा ही माझी नम्र विनंती आहे. कारण आपण सर्व एकत्रितपणे या नवीन अध्यायाला सुरुवात करत आहोत. जिथे प्रत्येकजण निर्भयपणे जगू शकेल, काम करू शकेल आणि भरभराट करु शकेल असा महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही अविरत कार्य करु.