लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का बसला. मनसेला वसंत मोरे यांनी दिला राजीनामा!

पुणे : मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी महत्त्वपूर्ण निवड केली आहे. प्रमुख सदस्य आणि इतर सर्व इतर सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. वसंत मोरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.

शेवटचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा… असे म्हणत वसंत मोरे यांनी मनसेला रामराम करत असल्याचे ट्विट केले आहे.

पत्रात नेमकं काय लिहिलंय?

प्रति,

मा. श्री राजसाहेब ठाकरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

विषयः माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.

आपणास सप्रेम जय महाराष्ट्र।

पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदावर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातल्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्याना ताकद देतो त्या सहकान्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून कोडी करण्याचे ‘तर अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम विनंती.

धन्यवाद ।

आपूज्य विश्वास.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

WPL 2024: गुजरात जायंट्सने 8 रणने यूपी वॉरियर्सचा पराभव केला.

Tue Mar 12 , 2024
WPL 2024 GG Vs UP: महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील अव्वल तीन स्थानांसाठीचा संघर्ष आता रंगतदार झाला आहे. आठ धावांनी गुजरात जायंट्सने यूपी वॉरियर्सचा पराभव केला. […]
गुजरात जायंट्सने 8 रणने यूपी वॉरियर्सचा पराभव केला.

एक नजर बातम्यांवर