Saptshringi Fort Rain : नाशिकमधील सप्तशृंगी गडावर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेले भाविकांची एकच झुंबड उडाली.
नाशिक: गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात चढ-उतार झाला आहे. गुरुवारी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले असून, राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात तुरळक पावसाने हजेरी लावली सप्तशृंगी गडावर आज जोरदार पाऊस झाला.
Saptshringi Fort Rain :
सप्तशृंगी गडावर मुसळधार पाऊस
नाशिकच्या सप्तशृंगी गडावर आज जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी आलेल्या ग्रामस्थांची व भाविकांची एकच गर्दी झाली होती. परिसरातील दुकानांच्या पायथ्याशी असलेले पाईपलाईन बंद झाल्याने परिसरातील दुकाने पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. सप्तशृंगी गडावरची सुरुवातीची पायरी मध्ये खूप प्रमाणात पाणी असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराबाबत स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. आणि त्याचा मुले हा स्थानिकांना त्रास भोगावा लागतो.
हेही वाचा: नैर्ऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली
राज्यातील अनेक भागात पिवळ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 47 तासांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत पावसाचा इशारा आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे IMD नुसार या भागात पावसाचा येलो अलर्ट आहे. याशिवाय, जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. . पुणे आणि अहमदनगरमध्ये काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल.
नाशिकचा पाणीपुरवठा कमी होत आहे.
नाशिक जिल्ह्यात 8.50टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे तेवीस मोठ्या धरणांपैकी दहा धरणांमध्ये अजिबात पाणीसाठा नाही. नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात अवघे 19 टक्के पाणी आहे. नाशिक करांना पावसाळ्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
Saptshringi Fort Rain : सप्तशृंगी गडावर जोरदार पाऊस, भाविकांची गर्दी, दुकानांमध्ये पाणी..