Resignation of Prime Minister of Bangladesh: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देऊन त्यांनी ढाक्यातून पळ काढला आहे.
बांगलादेशात सुरू असलेल्या आंदोलनात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आरक्षणाच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचे आता हिंसेत रूपांतर झाले आहे. रविवारी झालेल्या हिंसाचारात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इंटरनेटवर बंदी घालण्यात आली. अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे
बांगलादेशातील परिस्थिती अनियंत्रितपणे गोंधळलेली आहे. बांगलादेशचे लष्कर प्रमुख एक मोठे विधान करणार आहेत. बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हिंसक निदर्शने सुरू आहेत. पंतप्रधान हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो निदर्शकांनी कर्फ्यूचे उल्लंघन केले आणि राजधानीच्या रस्त्यांवरून पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे कूच केले, चिलखती वाहने आणि काटेरी तारांसह ढाक्यामध्ये पोलिस आणि सैन्याने हसिना यांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गांवर लावल्या आहे. पण प्रचंड गर्दीने या सगळ्या सीमा मोडल्या आहेत.
BANGLADESH. Thousands of protesters demand resignation of #SheikhHasina, prime minister of #Bangladesh. Students have led protests that have left more than 300 people dead. Army commander calls for calm.#BangladeshProtests pic.twitter.com/SqtRXDDc2z
— DiversaComunicaciones (@DiversaComunic2) August 5, 2024
कालच्या तीव्र संघर्षात कदाचित 98 जणांचा बळी गेला. त्यानंतर बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार-उझ-झमान देशाला संबोधित करतील. गेल्या महिन्यात निदर्शने सुरू झाल्यापासून मृतांची संख्या 300 वर पोहोचली आहे. 15 वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान शेख हसीना यांचा काळ सर्वात वाईट राहिला आहे. सध्या देशात अशांतता पसरली आहे. संपूर्ण बांगलादेशात निदर्शने व्यापक झाली आहेत आणि सरकारविरोधी चळवळी वाढल्या आहेत. लोकांच्या पाठिंब्याचे आवाहन करणारी गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बांगलादेशी विद्यार्थ्यांनी सोमवारी राजधानी ढाका येथे पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लाँग मोर्चा काढला. वृत्तानुसार, या आंदोलनाचे संयोजक आसिफ महमूद म्हणाले की, या सरकारने अनेक विद्यार्थ्यांचा बळी घेतला आहे. आता वेळ आली आहे की सरकारला त्यांच्या कृतीचा हिशोब द्यावा लागेल.’
विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आम्हाला मोर्चा काढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे त्यांनी जाहीर केले. माझ्या सैन्य बांधवांना, हुकूमशहांचे समर्थन करू नका. एकतर तुम्ही लोकांना पाठिंबा द्या किंवा निष्पक्ष व्हा. या कालावधीत बंद असलेले प्रत्येक विद्यापीठ पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारकडे 24 तासांचा अल्टिमेटम आहे.
Resignation of Prime Minister of Bangladesh
शेख हसीना सरकारने या निदर्शनांवर वक्तव्य करून देशातील विविध भागात दहशतवादी हल्ले होत असल्याचा आरोप केला आहे. हल्लेखोरांवर कडक कारवाई केली जाईल. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून देशभरात तीन दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवादी संबोधले. त्यानंतर आंदोलन अधिकच भडकले. 4 जुलै रोजी झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत त्यांनी आंदोलकांशी कठोरपणे वागण्याचे आदेश दिले होते. त्यांनी या आंदोलनादरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली होती.