महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला कार्ल्यात सुरुवात झाली आहे. तसेच आज संघ्याकाळी ७ वाजता एकवीरा आईची पालखी गडावर निघणार अजून त्याचा मान हा पनवेल कोळीवाडाला देण्यात आला आहे.
पुणे (कार्ला): कुलस्वामिनी असलेल्या आई एकविरा देवीची पालखी १५ एप्रिल रोजी संघ्याकाळी थाटामठात गुलाल उधळत तसेच अनेक वाद्य वाजवून भाविकांचा प्रचंड जनसागर हा एकवीरा आई गडावर पाहायला मिळतो. तसेच पनवेल कोळीवाड्याचा हा पहिला मान आहे त्यामुळे त्यांनी जय्यत तयारी केली असून पनवेल कोळीवाड्याची आई जरीमरी आणि आई एकवीरा देवी भेटीचा पालखी सोहळा हा सोमवारी कार्ला गड येथे मोठ्या उत्सवात होणार आहे .
हेही वाचा: आई एकविरा माता पालखी सोहळ्या निमित्त गडावर भाविकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन….
पनवेल कोळीवाडा आणि पनवेल कोळी आगरी समाज यांनी खूप थाटात जय्यत तयारी केली आहे. तसेच मुंबई, रायगड, कोकण, तळकोकण भागातून आलेल्या आई एकविरा देवीच्या पालख्या आणि भाविक येणार आहे त्यामुळे कार्ला गडावर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.