ॐ नमो भगवते वासुदेवाय, रविवारी येणाऱ्या मोहिनी एकादशीचे महत्व आणि कथा जाणून घ्या

Mohini Ekadashichi Katha Ani Mahthv: वैशाख मास, शुक्ल पक्षातील येणारी एकादशी रविवार दिनांक 19 मे 2024रोजी आहे. ह्या एकादशीला मोहिनी एकादशी असे संबोधतात. आज आपण महत्व आणि कथा जाणून घेऊया.

ॐ नमो भगवते वासुदेवाय, रविवारी येणाऱ्या मोहिनी एकादशीचे महत्व आणि कथा जाणून घ्या

समुद्र मंथनाच्या वेळेस भगवान विष्णू मोहिनी रूप धारण करतात आणि भस्मासूराचा वध करतात आणि देवतांना अमृत वाटतात. ह्या एकादशीचे व्रत केल्याने सर्व मोहातून मुक्त होतो व मोक्ष प्राप्त होतो. गोशाळेला घास इत्यादी दान करावे. ह्या दिवशी अवंतिका नगरीत शिप्रा नदीत अमृत महोत्सव साजरा होतो. श्री विष्णूंची – पंचामृत स्नान घालून व अभिषेक करून पूजा करावी. ह्या दिवशी तांदुळाच्या अक्षता न वापरता तिळाच्या अक्षता वापराव्या, पिवळ्या रंगाची फुले वहावीत. सहस्र तुळशी अर्चनाचे महत्व तर आहेच. श्री विष्णू सूक्त, नारायण सूक्त, श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राची आवर्तने, ॐ नमो नारायणाय / ॐ नमो भगवते वासुदेवाय किंवा अन्य विष्णू भगवानच्या नावाचा जप करावा. हे व्रत केल्याने, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यता, जन्म जन्मांतरीचे पाप नष्ट होतं , वैकुंठ धाम प्राप्ती होते. उपवास जरी नाही केला तरी दशमी आणि एकादशी ला भात, मसूर व वांगी खाऊ नये. कोणाबद्दलही अपशब्द काढू नये.

॥ ॐ नमो नारायणाय ॥

॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥

एकादशी प्रारंभ-

  • शनिवार
  • 18 मे 2024
  • सकाळी 11.23 मि.

एकादशी समाप्ती-

  • रविवार
  • 19 मे 2024
  • दुपारी 01.51 मि.

एकादशी पारणे-

  • सोमवार
  • 20 मे 2024
  • सकाळी 5.29 ते 8.13 मि.
Mohini Ekadashichi Katha Ani Mahthv

🔸मोहिनी एकादशी महत्व,कथा.🔸

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. धर्मशास्त्रानुसार, ही तिथी सर्व पापांना दूर करणारी आहे. या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला मोह आणि पापांपासून मुक्ती मिळते.

जी व्यक्ती मोहिनी एकादशीचे व्रत करत असेल, त्याने आदल्या दिवशी अर्थात दशमी तिथीच्या रात्री व्रताच्या नियमांचे पालन केले पाहिजे. व्रताच्या दिवशी एकादशी तिथीत व्रत करणार्‍याला सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायला पाहिजे आणि स्नान आदी करून स्वच्छ वस्त्र धारण केले पाहिजे. या दिवशी विष्णूसोबत रामाची पूजा देखील केली जाते. व्रताचे संकल्प घेतल्यानंतरच व्रत करायला पाहिजे. संकल्प या दोन्ही देवांसमोर घ्यायला पाहिजे. देवाची पूजा करण्यासाठी कलश स्थापना करून त्यावर लाल रंगाचे वस्त्र बांधून सर्वप्रथम कलशाची पूजा करावी.

त्यानंतर यावर देवाची प्रतिमा ठेवावी व त्या प्रतिमेला स्नानादि करून शुद्ध करून उत्तम वस्त्र घालावे. नंतर धूप, दीपने आरती करून फळांचा प्रसाद दाखवावा. तो प्रसाद वितरित करून ब्राह्मणांना भोजन व दान दक्षिणा द्यावी.

मोहिनी एकादशी व्रताची कथा…

सरस्वती नदीच्या काठी भद्रावती नावाचे नगर होते. तेथे धृतिमान नावाचा राजा राज्य करत होता. त्या नगरात एक बनिया राहत होता, त्याचे नाव धनपाल होते. तो विष्णूचा परम भक्त होता आणि नेहमी पुण्यकर्मात व्यस्त राहत होता. त्याचे पाच पुत्र होते – सुमना, द्युतिमान, मेधावी, सुकृत तथा धृष्टबुद्धि. धृष्टबुद्धि सदा पाप कर्मात लिप्त राहत होता. अन्यायाच्या मार्गावर चालून त्याने आपल्या वडिलांचे सर्व धन बरबाद केले होते.

हेही वाचा : आज स्वामी समर्थ प्रकट दिन ! जर तुम्हाला स्वामी तुमच्या पाठीशी हवे असतील तर ‘बाला’ हे १० चांगले विचार नक्की वाचा…

एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्रस्त होऊन त्याला घराबाहेर काढले आणि तो दारोदार फिरू लागला. फिरता फिरता तो महर्षी कौंडिन्यच्या आश्रमात पोहोचला आणि हात जोडून म्हणाला की, “माझ्यावर कृपा करून असे एखादे व्रत सांगा, ज्याच्या पुण्य प्रभावाने मला मुक्ती मिळेल.”

तेव्हा महर्षी कौंडिन्यने त्याला वैशाख शुक्ल पक्षामधील मोहिनी एकादशीबद्दल सांगितले. मोहिनी एकादशीचे महत्व ऐकून धृष्टबुद्धिने विधिपूर्वक मोहिनी एकादशीचे व्रत केले. या व्रतामुळे तो निष्पाप झाला आणि दिव्य देह धारण करून गरूडावर बसून श्री विष्णुधामाला गेला.

या प्रकारे हे मोहिनी एकादशीचे व्रत फारच उत्तम आहे. धर्म शास्त्रानुसार याचे पठण केल्याने सहस्र गोदानाचे फळ मिळतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

साऊथ सुपरस्टार रजनीकांत दिवंगत मित्र विजयकांत यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर भावूक ट्विट…मला खूप आठवण येते.

Fri May 17 , 2024
Rajinikanth’s Emotional Tweet After Vijayakanth Received The Padma Bhushan Award: विजयकांत यांना मरणोत्तर सन्मानित पद्मभूषण पुरस्कार प्रदान केल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. 28 डिसेंबर 2023 […]
साऊथ सुपरस्टार रजनीकांत दिवंगत मित्र विजयकांत यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर भावूक ट्विट...मला खूप आठवण येते.

एक नजर बातम्यांवर