Kalyan Badlapur Rain Update: बदलापूर, कल्याणमध्ये सध्या काय सुरू आहे? उल्हास नदी धोकादायक टप्प्यावर पोहोचली आहे का?

Kalyan Badlapur Rain Update: बदलापूर-कल्याण भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. बदलापूर-कल्याणमध्ये सध्या काय सुरू आहे? पाणी कुठे आहे? प्रशासनाने कुठे मदतकार्य पाठवले आहे सविस्तर जाणून घ्या.

Kalyan Badlapur Rain Update

आज महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, बदलापूर आणि कल्याण-डोंबिवली येथे सध्या भरपूर पाऊस पडत आहे. कल्याण भागात येथे पुराची भीती आहे. बदलापूर आणि कल्याण डोंबिवलीतील परिस्थिती कशी आहे? चला जाणून घेऊया. बदलापुरमधून उल्हास नदी वाहते.. कामानिमित्त कल्याण-बदलापूर येथून हजारो लोक दररोज मुंबईला जातात. काल रात्रीपासूनच पाऊस पडत आहे. मात्र, सकाळपासून पावसाने जोर धरला आहे.

बदलापूर

  • एनडीआरएफचा ताफा बदलापुरात दाखल झाला आहे.
  • आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफकडून मदत.
  • उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे बदलापूर येथे एनडीआरएफची टीम
  • सखल भागात राहणाऱ्या लोकांना सोनिवलीच्या बीएसयूपी प्रकल्पात तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.
  • उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बदलापूरच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. बदलापूर येथील भारत कॉलेज परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना एक ते दीड फूट पाण्यातून जावे लागत आहे.

Kalyan Badlapur Rain Update

  • बदलापूर येथील भारत महाविद्यालयाजवळील रस्ता पाण्याखाली गेला आहे.
  • बदलापूरमध्ये उल्हास नदी ओसंडून वाहत आहे.
  • बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला.
  • नदीची पातळी सध्या 18.27 मीटरवर आहे, तर धोक्याची पातळी 17.51 मीटर आहे.
  • उल्हास नदीकाठचा पेट्रोल पंपही पाण्यात बुडाला आहे.
  • एनडीआरएफचे अतिरिक्त 32 सदस्यीय पथक ठाणे येथून बदलापूरसाठी रवाना झाले.
  • प्रशासनाने खबरदारी म्हणून बदलापूर शहरातून बदलापूर गाव आणि आसपासच्या ग्रामीण भागात सर्व प्रवास बंद केला आहे.

हेही वाचा: पुण्यात रेड अलर्ट जारी, पुढील तास महत्वाचे शाळा कॉलेज बंद, हवामानाचाअंदाज काय आहे?

कल्याण

  • कल्याणनगर रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे
  • कल्याण टिटवाळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूर आला आहे.
  • कल्याण शिवाजीनगर परिसर जलमय झाला आहे
  • पाण्यात मुलांचे जीव धोक्यात घालून शाळेतील गाडीचा प्रवास
  • भर पाण्यात बस बंद पडल्याने नागरिकांनी धक्का मारत विद्यार्थ्यांना काढले सुरक्षित बाहेर.
  • वालधुनी नदीच्या आजूबाजूच्या शिवाजीनगर, अशोकनगर आणि परिसरातील घरांमध्ये पाणी साचले आहे.
  • घरातील रहिवासी आपली मालमत्ता सोडून रस्त्यावर उतरली आहे .
  • कल्याण शहाड येथे मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे.
  • कल्याण नगर मार्गाचा अर्धा भाग बंद होता. कल्याण टिटवाळा रोडच्या शहाड मोहने जवळ रोडवर पाणी रस्तावर वाहत आहे.

Kalyan Badlapur Rain Update

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कांद्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, या 3 शहरांमध्ये कांद्याच्या बँका सुरू होणार…

Thu Jul 25 , 2024
Eknath Shinde will start onion banks in 3 cities: कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी पणन […]

एक नजर बातम्यांवर