Exit Polls for Thane Lok Sabha Elections 2024: 4 जून रोजी निकाल होणाऱ्या निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या एक्झिट पोलने आश्चर्यकारक अंदाज वर्तवला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या घरच्या बालकिला जाणार असे वाटत आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजन विखारे आणि एकनाथ शिंदे यांचे सहकारी नरेश म्हस्के यांच्यात जोरदार लढत झालेली दिसून येते . 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
Exit Polls for Thane Lok Sabha Elections 2024
या एक्झिट पोलने आश्चर्यकारक अंदाज वर्तवला आहे. महायुतीला 22 जागा, महाआघाडीला 25 जागा आणि एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार भाजपला 18 जागा मिळतील, त्यापाठोपाठ शिंदे यांच्या शिवसेनेला 4, काँग्रेसला 5, ठाकरे गटाला 14 आणि पवार गटाला 6 जागा मिळतील असा अंदाज आहे. अजित पवार गट एकही जागा मिळणार नसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा: कल्याण मध्ये कोणाची सत्ता? श्रीकांत शिंदे का वैशाली दरेकर एक्झिट पोल मध्ये जाणून घ्या…
लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजन विखारे आणि एकनाथ शिंदे गटातून नरेश म्हस्के यांच्यात जोरदार लढत झाले. त्यामुळे सर्वांच्या नजरा विजेत्यावर केंद्रित आहेत. एक्झिट पोलने ठाकरे गटाचे राजन विखार आघाडीवर असून नरेश म्हस्के पिछाडीवर असल्याचे एक्झिट पोलमधून स्पष्ट झाले आहे. तसे झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा फटका बसणार आहे. आणि त्याचा बालकिल्यात त्यांना खूप प्रमाणात फटका बसेल असे वाटत आहे .