भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आरोप-प्रत्यारोपां मुळे लढतीला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. भिवंडी मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपचे उमेदवार कपिल पाटील आणि राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्यात चुरशीची लढत झाली. तसेच तिसरे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे देखील चर्चेत आहे.
Exit Poll For Bhiwandi Lok Sabha Election 2024
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगत आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघातील लढतीला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस झाली. लोकसभेत चुरशीची लढत होत आहे. भाजपचे उमेदवार कपिल पाटील आणि राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा ) यांच्यात लोकसभा निवडणूक झाली असून आता भिवंडीत सर्वांचे लक्ष हे 4 जूनच्या निकाल मध्ये लागला आहे.
हेही समजून घ्या: देशात नेमकी कुठला पक्ष सरकार स्थापन करणार ? जाणून घेऊया विविध संघटनांच्या एक्झिट पोलचे आकडे…
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. एकीकडे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे उमेदवार बाल्या मामा यांच्याकडून टीका होत असताना, पाटील त्यांना चोख प्रत्युत्तर देताना दिसून आले.
Exit Poll For Bhiwandi Lok Sabha Election 2024
दोघांच्या लढतीत कोण जास्त ताकदवान होणार हे आता निकालामध्ये दिसून येणार? भिवंडीत यंदा कमल फुलणार, की तुतारी वाजणार ? याबाबत लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असतानाच काढण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये कपिल पाटील आघाडीवर असल्याचे दिसून येते . तर बाळ्या मामा म्हात्रे हे पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.