16 April 2024

Batmya 24

Stay updated

कार्ला-वेहेरगाव मध्ये एकवीरा आईच्या भक्तांना तेथील ग्रामस्थ तसेच उपसरपंच कडून शिवीगाळ.. काय आहे प्रकरण जाणून घ्या

Devotees of Mother Ekvira abused in Karla-Vehergaon: दि.३/३/२०२४ रोजी ही घटना घडली आहे. वेहेरगाव कार्ला येथे ग्रामस्थ तसेच उपसरपंच कडून शिवीगाळ व येणाऱ्या पर्यटकांना मारहाण व मारण्याची धमकी देण्यात आली आहे .

वेहेरगाव कार्ला: वेहेरगाव- कार्ला येथे असलेलं कार्ला_एकविरा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. इथे येणारे पर्यटक हे आगरी-कोळी व इतर समाजातील लोक दर्शनासाठी येत असतात. एकविरा आई च्या दर्शनासाठी येणारे भाविक हे बँड व इतर वाद्ये घेऊन येतात. तिथे असलेले रुम-हाॅल, धर्मशाळा मध्ये रात्री चा मुक्काम करतात तसेच गाणी-आर्केस्टा बोलून एक उत्साह – आनंद साजरा करण्यासाठी येतात. पण आता दिवसेंदिवस तेथे खूप प्रमाणात भांडण तसेच पर्यटकांना खूप प्रमाणात त्रास सहन करावा लागतो .

दि.३/३/२०२४ रोजी ही घटना घडली आहे. काही भाविक एकवीरा देवीच्या दर्शनाला आले होते पण तेथील काही ग्रामस्थ व उपसरपंच यांच्या मध्ये वाद झाला .

हेही समजून घ्या: Sindhudurg Anganewadi Yatra 2024: कोकणातील पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी यात्रेला सुरुवात झाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

लहान मुले बँड वाजवत असताना वेहेरगावातील ग्रामस्थ आणि भाविकमध्ये असण्याऱ्या महिलांना शिवीगाळ व अपशब्द वापरले जात होते. ग्रामस्थ आणि वेहेरगावातील उपसरपंच शंकर बोरकर कडून धमकी देण्यात आली. तसेच हे सर्व प्रकरण श्री. राज पाटील ( शेतकरी संघटना – कोकण विभागीय अध्यक्ष ) या भाविकांनी विडिओ मार्फत उघडकीस आणला.

विडिओ पहा.

भाविकांनी या घटनेचा निषेध केला असून अशी मागणी केली आहे कि लवकरात लवकर गावगुंडांवर फौजदारी कारवाई करावी. अशी मावळ तालुका वरिष्ठ निरीक्षक ह्यांना विनंती आहे.