महाराष्ट्र पोलीस भरती 2026 अंतर्गत यंदा मोठ्या प्रमाणात स्पर्धा पाहायला मिळत आहे. राज्यभरातील एकूण 15,405 रिक्त पदांसाठी तब्बल 16 लाख 52 हजार 850 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सरासरी पाहता एका पदासाठी सुमारे 108 उमेदवार रिंगणात आहेत. यावरून पुन्हा एकदा सरकारी नोकरीची क्रेझ किती मोठी आहे हे स्पष्ट होते.

मुंबई, ठाणे शहर व ग्रामीण भागासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई, चालक, बँड्समन, कारागृह शिपाई आणि SRPF अशा पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता उमेदवारांचे लक्ष मैदानी चाचणी आणि प्रवेशपत्राकडे लागले आहे.
जिल्हानिहाय स्पर्धेचे चित्र
ठाणे शहर पोलीस दलातील 654 जागांसाठी 21,002 अर्ज प्राप्त झाले असून एका जागेसाठी सरासरी 32 उमेदवार आहेत.
ठाणे ग्रामीण पोलीस दलात 167 जागांसाठी सुमारे 4,700 अर्ज आले असून एका जागेसाठी 28 उमेदवार स्पर्धेत आहेत.
राज्यात सर्वात कमी म्हणजे केवळ 19 पदे बँड्समनची असून, एका बँड्समन पदासाठी तब्बल 895 उमेदवार स्पर्धा करत आहेत.
पदनिहाय अर्जांची संख्या
- शिपाई: 12,702 जागा – 7,86,500 अर्ज
- चालक: 478 जागा – 1,80,000 अर्ज
- बँड्समन: 19 जागा – 17,000 अर्ज
- कारागृह शिपाई: 554 जागा – 3,34,350 अर्ज
- SRPF: 1,652 जागा – 3,35,000 अर्ज
मैदानी चाचणी कधी होणार?
प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस भरतीची मैदानी चाचणी फेब्रुवारी 2026 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. अर्ज पडताळणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या स्लॉटनुसार प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे.
Police Physical Test Admit Card कसे डाउनलोड कराल
- महाराष्ट्र पोलीस भरतीचे अधिकृत पोर्टल उघडा
- “Maharashtra Police Physical Test Admit Card 2025” हा पर्याय निवडा
- अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाका
- लॉगिन केल्यानंतर तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल
- प्रवेशपत्र PDF स्वरूपात डाउनलोड करा
- सर्व तपशील नीट तपासून किमान दोन प्रती प्रिंट काढा
मैदानी चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- प्रवेशपत्र (Admit Card)
- आधार कार्ड / पॅन कार्ड (ओळखपत्र)
- ऑनलाईन अर्जाची प्रिंट
- पासपोर्ट साईज फोटो
- सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे
- आरक्षण प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- LMV लायसन्स (चालक पदासाठी)
प्रवेशपत्राशिवाय मैदानात प्रवेश दिला जाणार नाही. दिलेल्या तारीख व वेळेत गैरहजर राहिल्यास उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होऊ शकतो.
महाराष्ट्र पोलीस भरती 2025–2026 मध्ये यंदा स्पर्धेचा स्तर खूपच वाढलेला आहे. लाखो उमेदवारांचे स्वप्न पोलीस होण्याचे असून, यासाठी शारीरिक तयारी, मानसिक तयारी आणि योग्य कागदपत्रांची पूर्तता अत्यंत महत्त्वाची आहे. मैदानी चाचणीसाठी उमेदवारांनी आतापासूनच तयारीला लागणे गरजेचे आहे.
