अन्नदाता सुखी भव, अन्न हे पूर्णब्रह्म आहे, मिलिंद गवळी या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Milind Gawli will cook in Sugran Jodi of Maharashtra: मिलिंद गवळी, अभिनेता, सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. ते वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत राहतात. सध्या, ते अन्नदाता वर पोस्ट केली असून सध्या हि चर्चेचा विषय झाला आहे. तर जाणून घेऊया.

Milind Gawli will cook in Sugran Jodi of Maharashtra

टीव्ही शो वरील गाजलेले मराठी सिरीयल म्हणजे ‘आई कुठे काय करते’ ही एक मालिका प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. ते वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत राहतात. या मालिकेतून तो आजही नव्या पोस्ट वर चर्चेत आहे. अन्न तयार करण्यास असमर्थ. मात्र, शूटिंगसाठी जेवण तयार करावे लागले. मिलिंद गवळीच्या म्हणण्यानुसार, भविष्यात आपल्याला अशा गोष्टी कराव्या लागतील ज्या आपण आता टाळतो.

माझ्या आईने माझ्या बहिणीला खरोखर चांगला स्वयंपाक कसा करायचा हे शिकवले, पण मी काहीच शिकले नाही. मात्र, मला आता ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा भाग म्हणून ‘महाराष्ट्राची सुगरण जोडी’ या स्वयंपाकाच्या कार्यक्रमात भाग घ्यायला लागला आहे. म्हणून आता मला अनेक पदार्थ बनवायचे आहेत.

मिलिंद गवळी यांची पोस्ट

Milind Gawli will cook in Sugran Jodi of Maharashtra

“अन्नदाता सुखी भव”
“अन्न हे पूर्णब्रह्म”,

“माणसाच्या हृदयाची वाढ त्याच्या पोटा तून जाते”,
एखाद्या व्यक्तीच्या हातचं चविष्ट जेवण जेवल्यानंतर, आपलं पोट नाही तर मन भरत, आणि एखाद्याच्या हाताची चव, किंवा एखाद्याच्या हातचा पदार्थ आपण जर आनंदाने खाल्ला तर तो आपल्याला आयुष्यभर स्मरणात राहतो,
माझी आई अतिशय सुगरण, मी तिच्याशी तासंतास किचनमध्ये गप्पा मारत बसायचो पण ती जो पदार्थ बनवत असे त्याच्या कडे मी फार कधी लक्ष दिलं नसल्यामुळे मला स्वयंपाकातलं फार काही कळत नाही, तिला जर स्वयंपाकात मदत केली असती तर मी चांगला शेफ नक्कीच झालो असतो, त्याबाबतीत मी दुर्दैवी ठरलो, माझ्या आईकडून माझी बहीण उत्तम स्वयंपाक शिकली पण मी काहीच नाही शिकलो

पण आता “आई कुठे काय करते” या मालिकेमध्ये मला या “महाराष्ट्राची सुगरण जोडी” या कुकरी शो मध्ये सहभाग घ्यावाच लागला आहे, वेगळे वेगळे पदार्थ बनवावेच लागत आहे,
एखाद्याच्या नशिबात जर एखादी गोष्ट लिहिलेली असेल तर ती त्याच्या वाटेला येतेच येते, आयुष्यभर तुम्ही जर ती टाळत असाल तरी तुमची सुटका नाही.

हे सुद्धा वाचा: लग्नानंतर 14 दिवसांनी सासर मध्ये काय झाले? सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “आई आणि बाबा माझ्यासाठी,” भावनिक इंस्टाग्राम पोस्ट

जसं माझी आई खूप अध्यात्मामध्ये, देव पुजे मद्धे व्यस्त असायची, त्यामुळे मी कधी देवपूजा, मंदिरात जाणं, हे वर्षानुवर्ष टाळलं होतं . कारण मला असं वाटायचं की माझी आई आम्हा सगळ्यांच्या वाटणीची ईश्वर आराधना करते मग आपण कशाला करा, पण माझं नशीब बघा मी सिनेमात काम करायला लागलो आणि मला सगळ्यात जास्ती अध्यात्मिक, देवाधर्माचे सिनेमे मिळाले, ज्याच्यामुळे मला महाराष्ट्रातल्या सगळ्या देवस्थानात जाण्याची, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शूटिंग करायची संधी मिळाली,

शूटिंगच्या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्याच मुख्य देवस्थानांना भेटी दिल्या आहेत. शिर्डीचे साईबाबा अक्कलकोटचे स्वामी समर्थ शेगावचे गजानन महाराज गणेशपुरी वज्रेश्वरी चे नित्यानंद महाराज गगनगिरी महाराज, जेजुरी खंडोबा सकट महाराष्ट्र कर्नाटकातले बारा खंडोबा मी केले आहेत, चार ज्योतिर्लिंग, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई भवानी , वणीची सप्तशृंगी देवी, कारल्याची एकवीरा देवी, मी आळंदी ते पंढरपूर विठ्ठल विठ्ठल या सिनेमासाठी वारी पण केली आहे . आता बहुतेक माझ्या आयुष्यातला एक वेगळे वळण मिळणारे आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने बहुतेक cooking, किंवा अन्नदान, world cuisine , किंवा Tasty but still healthy food. आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी टाळतो त्याच गोष्टी कदाचित आपल्याला भविष्यामध्ये कराव्या लागत असाव्यात. एका वेगळ्या प्रवासासाठी, अनुभवासाठी मी तयार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Tata Nexon Crash Test Rating: टाटा चा नाद करायचा नाय, Nexon ने क्रॅश चाचणी दरम्यान सर्वाना टाकले मागे…

Thu Jul 11 , 2024
Tata Nexon Crash Test Rating: नेक्सॉन फेसलिफ्टने ग्लोबस न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (GNCAP) कडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळवले आहे हे लक्षात घेता. सुरक्षा आमच्या ‘DNA’ […]
tata Nexon Crash Test Rating

एक नजर बातम्यांवर