भारतीय टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक म्हणजेच GDS पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Branch Postmaster BPM Assistant Branch Postmaster ABPM आणि Dak Sevak या पदांचा समावेश आहे.

या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे GDS भरतीमध्ये निवड प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा किंवा मुलाखत नसून 10वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते.
10वी पास उमेदवारांना मोठी संधी
पोस्ट ऑफिसच्या GDS भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वीमध्ये गणित आणि इंग्रजी विषयाचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे. यासोबत संबंधित पदासाठी आवश्यक स्थानिक भाषेचा 10वीपर्यंत अभ्यास केलेला असणे गरजेचे आहे. संगणकाचे मूलभूत ज्ञान आणि सायकल चालवण्याचे ज्ञान देखील आवश्यक आहे.
31 ऑगस्टपासून नोंदणी सुरू
अधिकृत India Post वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार GDS भरतीसाठी एकवेळ नोंदणी प्रक्रिया 31 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना 19 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी करता येईल. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 2 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 5 वाजता आहे.
अर्जात दुरुस्तीची संधी
अर्ज भरल्यानंतर काही माहिती चुकीची राहिल्यास उमेदवारांना दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी 23 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत Correction Window उपलब्ध असेल. त्यामुळे अर्ज भरताना उमेदवारांनी नाव शैक्षणिक माहिती जन्मतारीख आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी.
वयाची अट किती?
GDS पदांसाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 40 वर्षे असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयामध्ये सवलत दिली जाते. SC आणि ST उमेदवारांना 5 वर्षांची तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत आहे. इतर पात्र प्रवर्गांसाठीही लागू नियमांनुसार सवलत दिली जाते.
GDS पदांसाठी किती पगार मिळतो?
GDS पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना TRCA म्हणजेच Time Related Continuity Allowance अंतर्गत मानधन मिळते. Branch Postmaster पदासाठी TRCA 12,000 ते 29,380 रुपये आहे. Assistant Branch Postmaster आणि Dak Sevak पदांसाठी 10,000 ते 24,470 रुपये TRCA दिले जाते. याशिवाय लागू नियमांनुसार महागाई भत्ता आणि इतर काही लाभ मिळतात.
अर्ज शुल्क किती?
GDS भरतीसाठी सामान्य उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. मात्र महिला उमेदवार तसेच SC ST PwBD आणि Transwoman उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.
निवड प्रक्रिया कशी होणार?
GDS भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रामुख्याने 10वीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादीद्वारे केली जाते. त्यामुळे या भरतीसाठी वेगळी लेखी परीक्षा किंवा मुलाखत नसणे हे उमेदवारांसाठी महत्त्वाचे आहे. 10वीमध्ये चांगले गुण असलेल्या उमेदवारांना निवडीची चांगली संधी मिळू शकते.
नेपाळमध्ये भीषण पूर; शेकडो जण बेपत्ता, 105 भारतीयांचा समावेश
GDS ही नियमित सरकारी नोकरी आहे का?
India Post ने स्पष्ट केले आहे की GDS पदावरील कर्मचारी नियमित केंद्र सरकारी कर्मचारी नसतात. त्यांच्या सेवा अटी Gramin Dak Sevaks Conduct and Engagement Rules अंतर्गत असतात. GDS कर्मचाऱ्यांना साधारणपणे ग्रामीण भागात सेवा द्यावी लागते. कामाचे स्वरूप आणि सेवा अटी नियमित सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा वेगळ्या आहेत.
अर्ज कुठे करायचा?
GDS भरतीसाठी अर्ज फक्त अधिकृत India Post GDS पोर्टलवरून करणे योग्य आहे. उमेदवारांनी बनावट वेबसाइट किंवा अनधिकृत लिंकवर आपली वैयक्तिक माहिती देऊ नये. अधिकृत पोर्टलवर GDS Online Engagement Schedule-II July 2026 ची नवीन सूचना उपलब्ध आहे.
महत्त्वाच्या तारखा
नोंदणी सुरू: 31 ऑगस्ट 2026
नोंदणीची अंतिम तारीख: 19 सप्टेंबर 2026
ऑनलाइन अर्ज सुरू: 2 सप्टेंबर 2026
ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 21 सप्टेंबर 2026
अर्ज दुरुस्ती: 23 आणि 24 सप्टेंबर 2026

