Groww App | शेअर बाजार उघडताच आज ग्रो ॲपने गुंतवणूकदारांना निराश केले. हा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म अचानक बंद झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह सुरुवातीलाच कमी झाला .अनेकांनी लॉगिन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना लॉगिन करता आले नाही. बाजारात काय सुरु आहे. हे गुंतवणूकदारांना कळाले नाही. त्यामुळे त्यांचा संताप झाला.
नवी दिल्ली | 23 January 2024 : ऑनलाईन ब्रोकर प्लॅटफॉर्म Groww ॲप बंद आणि त्याच्य ग्राहकांवर अचानक संकट कोसळलं. मंगळवार हा ग्रोसाठी घातवार ठरला. हा आघात गुंतवणूकदार सहन करु शकले नाहीत. त्यांनी ग्रो या ब्रोकिंग प्लॅटफॉर्मवर संताप व्यक्त केला. इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान हे ॲप बंद झाल्याने युझर्स खूप भडकले. बाजार सुरु होताच ही समस्या उद्भवल्याने कितीवेळ ग्राहकांना नेमकं काय होतंय याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे त्यांना बाजारात ट्रेडच करता येत नव्हता. आणि त्यांना ॲपवर लॉगिन होता येत नव्हते. त्यामुळे याचा नुसकान ग्राहकांवर झाला आहे ..
कंपनीने दिले असे उत्तर…
Groww टीमने लागलीच यावर प्रतिक्रिया दिली. तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या उद्भवल्याचा दावा करण्यात आला. कंपनीने या तांत्रिक चुकीबद्दल गुंतवणूकदारांची माफी मागितली. व दिलगिरी व्यक्त देखील केली. पण सकाळच्याच वेळात ट्रेड न करता आल्यामुळे ग्राहकांची या प्लॅटफॉर्मवर खप्पामर्जी झाली. त्यांनी संताप व्यक्त केला. ग्रो ॲपने लागलीच ही समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. पण तोपर्यंत सोशल मीडियावर ग्राहकांनी त्यांच्या संतापाला वाट मोकळी करुन दिली होती…
Groww ॲप डाउनलोड केल्यानंतर, ग्राहकांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मबद्दल गर्दी केली. त्यांचा राग बाहेर काढण्याचा मार्ग म्हणून त्यांनी ॲपला मीम्सने भरले. ग्रो ॲप क्रॅश हा हॅशटॅग बनला. ग्राहकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? समस्येचे स्वरूप आणि कंपनीच्या प्रतिसादाबद्दल संतप्त प्रतिक्रिया. काहींनी सोशल मीडियावर मदत विनंत्या पोस्ट केल्या. तसेच लॉगिन समस्या काय आहे याची चौकशी केली. याबाबत चौकशी केली. काही लोकांनी आपला राग दाखवला.
अधिक वाचा –हाँगकाँग भारतीय शेअर बाजाराला मागे टाकून जागतिक स्तरावर ४ क्रमांकाचा शेअर बाजार बनला आहे
एक तास होते ग्रो ॲप बंद
ग्रो ॲप जवळपास एक तास बंद होते. त्यामुळे या ॲपवर ग्राहकांचा क्रोध दिसून आला. काही युझर्सने त्यांच्या जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ट्रेड लावत असतानाच मध्येच ॲप बंद झाले. त्यामुळे तो ट्रेड हुकल्याचा संताप एका युझरने व्यक्त केला. तर काहींनी जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत हे ॲप अनइन्स्टॉल करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच या मध्ये खूप ग्राहकांना त्रास सहन करावा लागला तसेच आता ग्रो ॲप कंपनी आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.