Rohit Sharma Tweeted To Cricket Fans: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ट्विट द्वारे मोठे विधान केले आहे. जाणून घ्या

Rohit Sharma tweeted to cricket fans: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषकात विजय मिळवला. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाचा देशभरात जल्लोष सुरू आहे. यादरम्यान, कर्णधार रोहित शर्माने ट्विट करून महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

Rohit Sharma Tweeted To Cricket Fans

29 जून रोजी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून ICC T20 विश्वचषक विजेतेपद पटकावले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T20 विश्वचषक जिंकला. महेंद्रसिंग धोनीपासून कर्णधार असलेल्या रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांचा 17 वर्षांचा असणारा रिकॉर्ड मोडला. हवामानाच्या परिस्थितीमुळे टीम इंडियाला अनेक दिवस बार्बाडोसमध्ये घालवावे लागले. मात्र, त्यानंतर टीम इंडिया भारताच्या दिशेने रवाना झाली आहे. गुरुवार, 4 जुलै रोजी टीम इंडियाचे प्लेइंग आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य नवी दिल्लीत उतरतील. त्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ट्विट करून क्रिकेट चाहत्यांना माहिती दिली आहे .

Rohit Sharma Tweeted To Cricket Fans

रोहित शर्माच्या विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांचे स्वागत करण्यासाठी तयार आहेत. बुधवारी त्यांची पंतप्रधानांशी भेट झाल्यानंतर टीम इंडिया मुंबईला रवाना होणार आहे. त्यानंतर, खुल्या डेक बसने वर्ल्ड कप ट्रॉफी आणि टीम इंडियाच्या खेळाडूंची मिरवणूक काढली जाईल. रोहितने ट्विट करून सर्व क्रिकेट रसिकांना या मिरवणुकीसाठी सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे.

रोहित शर्माचे ट्विट

आम्हाला तुमच्या सर्वांसोबत या खास क्षणाचा आनंद घ्यायचा आहे.

चला तर मग 4 जुलै रोजी संध्याकाळी 5:00 वाजल्यापासून मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे येथे विजय परेडसह हा विजय साजरा करूया.

ते घरी येत आहे ❤️🏆

हेही वाचा: डेव्हिड मिलरने निवृत्ती घेतली का नाही ? पोस्ट करत केला मोठा खुलासा…

टीम इंडियाच्या खेळाडूंनी 2007 च्या T20 विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईत पहिल्यांदा मिरवणूक होती. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचा बेस्टच्या डबल डेकर ओपन एअर बसमधून मिरवणूक काढली होती. त्यावेळी मुंबईत क्रिकेट प्रेमींचा खूप जल्लोष पाहायला मिळाला होता . त्यावेळी रोहित शर्मा इंडिया मध्ये फक्त खेळाडू होता. मात्र, यंदा रोहित कर्णधार आहे. त्यामुळे मुंबईकरांना त्याचा अभिमान आहे. त्यामुळे सर्व भारतीय क्रिकेट चाहते पुन्हा एकदा आपल्या लाडक्या मुंबईकर खेळाडूच्या आणि संपूर्ण टीम इंडियाच्या समर्थनार्थ एकत्र येतील तसेच उद्या हि मिरवणुक संध्याकाळी 5:00 वाजल्यापासून मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे स्टेडियम पर्यंत निघणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

लाडकी बहीण योजना: कुटुंबातील किती महिलांना लाभ होईल? फडणवीस यांची विधानसभेत प्रतिक्रिया

Wed Jul 3 , 2024
How many women in the family will benefit in Ladaki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलैमध्ये लागू झाली. या योजनेत सरकार कडून अनेक […]
How many women in the family will benefit in Ladaki Bahin Yojana

एक नजर बातम्यांवर