IPL 2026 बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेश सरकारने आयपीएल स्पर्धेचं थेट प्रसारण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर दक्षिण आशियातील क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमानला IPL मधून वगळण्यात आल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि सरकार दोघेही नाराज झाले. याच पार्श्वभूमीवर भारताशी संबंधित क्रिकेट स्पर्धांबाबत कठोर भूमिका घेतली जात असल्याचं दिसत आहे.
भारताविरोधात बांगलादेशची भूमिका कडक
मुस्तफिझुरच्या प्रकरणानंतर बांगलादेशने याआधीच टी20 वर्ल्डकपसाठी भारतात खेळण्यास नकार दिला आहे. इतकंच नव्हे, तर भारताविरुद्धचे सर्व सामने श्रीलंकेत घेण्यात यावेत, अशी मागणी आयसीसीकडे करण्यात आली आहे. या मागणीवर अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.
अशा परिस्थितीत आता IPL प्रसारणावर थेट बंदी घालण्यात आल्याने हा विषय आणखी चिघळला आहे.
IPL 120 पेक्षा जास्त देशांत दाखवली जाते, पण…
IPL ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी टी20 लीग आहे. ही स्पर्धा 120 हून अधिक देशांमध्ये टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखवली जाते. मात्र, राजकीय आणि क्रीडा संबंधांमुळे काही देशांमध्ये IPL चं अधिकृत प्रसारण होत नाही.
पाकिस्तानात आधीपासूनच बंदी
बांगलादेशव्यतिरिक्त पाकिस्तानमध्येही अनेक वर्षांपासून IPL प्रसारणावर बंदी आहे. पाकिस्तानातील कोणत्याही टीव्ही चॅनेल किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर IPL दाखवली जात नाही. काही प्रेक्षक VPN च्या माध्यमातून सामने पाहतात, पण अधिकृतरित्या स्पर्धेचं प्रसारण होत नाही.
हेही वाचा: Adelaide Strikers vs Sydney Thunder – 6 धावांनी Strikersचा थरारक विजय”
याशिवाय, आफ्रिकेतील काही देश, मध्य आशियातील राष्ट्रं आणि लहान बेटांवर क्रिकेट फारसे लोकप्रिय नसल्याने तिथेही IPL दाखवली जात नाही. मात्र YuppTV सारख्या प्लॅटफॉर्ममुळे युरोप, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण-पूर्व आशियातील अनेक भागांमध्ये IPL सहज उपलब्ध आहे.
बांगलादेशमध्ये IPL चाहत्यांची मोठी संख्या
विशेष म्हणजे, बांगलादेशमध्ये IPL चे प्रचंड चाहते आहेत. कारण आतापर्यंत अब्दूर रज्जाक, मोहम्मद अशरफुल, मशरफे मुर्तजा, लिट्टन दास आणि मुस्तफिझुर रहमान यांसारखे खेळाडू IPL मध्ये खेळले आहेत.
आतापर्यंत T Sports या चॅनेलवर IPL चे प्रसारण बांगलादेशमध्ये होत होते. मात्र सरकारच्या निर्णयामुळे आता बांगलादेशातील चाहत्यांना IPL पाहण्यापासून वंचित राहावं लागणार आहे.

1 thought on “IPL 2026: बांगलादेशमध्ये IPL प्रसारणावर अचानक बंदी”