India Vs Pakistan Live Streaming Match: क्रिकेट चाहते रोमांचक T20 विश्वचषक सामन्याची वाट बघत आहे. आणि भारत विरुद्ध पाकिस्तान हि मॅच तर पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. हि मॅच बघण्यासाठी प्रेक्षक आपला वेळ काढुन बघत असतात.
T20 विश्वचषकातील सर्वात महत्त्वाचा सामना हा इंडिया विरुद्ध पाकिस्तानचा असतो. विश्वचषक स्पर्धेपेक्षा हा खेळ अधिक महत्त्वाचा आहे या सामन्याकडे क्रिकेट खेळणाऱ्या सर्वांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. मात्र, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडे आहे. विश्वचषकापेक्षा हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा खेळ असेल. त्यामुळे या सामन्यात प्रेक्षकांसाठी क्रिकेटचे प्रचंड तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या सामन्यात इंडिया आणि पाकिस्तान मध्ये जास्त इंडियाने सामने जिकंलेले दिसून येते.
India Vs Pakistan Live Streaming Match
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप मध्ये आता भारताला आणि पाकिस्तानला हा सामना जिंकावा असे वाटत असले तरी आता दोन्ही संघाचे खेळाडू हे चांगले खेळत असल्यामुळे हा सामना कोण जिंकेल हे बघणे महत्वाचे ठरेल .
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम :
बाबर आजम (कप्तान), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफ्रीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफ्रीदी आणि उस्मान खान.
हेही वाचा: दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला, सहा गडी राखून सहज विजय मिळवला.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना केव्हा?
हा सामना रविवारी 9 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे?
हा सामना नासाऊ क्रिकेट काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, न्यूयॉर्क येथे होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर डीडी स्पोर्ट्सवर सामना फ्री मध्ये पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईवर कुठे पाहता येणार?
हा सामना मोबाईलवर Disney+ hotstar या एपवर पाहायला मिळेल.