वडील भाजपमध्ये, तर मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीत. दोघेही बाप-लेक निवडणूक लढवणार, विधानसभा कोण जिंकणार?

Sandeep Naik Joins Sharad Pawar Party: संदीप नाईक मंगळवारी शरद पवार गटात सामील होणार आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार न दिल्याने ते भाजपवर नाराज आहेत. आज संदीप नाईक यांनी वाशी येथे निर्धार मेळावा आयोजित केला होता.

Sandeep Naik Joins Sharad Pawar Party

नवी मुंबई: या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा जो कल असेल आणि ते सांगतील त्या पक्षात मी प्रवेश करेन, असे संदीप नाईक यांनी सांगितले. यावरून संदीप नाईक यांचा शरद पवार गटात प्रवेश प्रवेश निश्चित झाला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काही वेळापूर्वी संदीप नाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यासाठी वाशीला रवाना झाले होते. संदीप नाईक यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संदीप नाईक तुतारी हाती धरली आहे.

बेलापूर मतदारसंघातील सर्व रहिवासी, तसेच वर्षानुवर्षे मला पाठिंबा देणारे कार्यकर्ते आज त्यांच्या भावना व्यक्त करतील, असा दावा त्यांनी केला. मी दोन टर्म आमदार आणि एक टर्म नगरसेवक मी राहिलो आहे. यावेळी मी नवी मुंबईच्या विकासासाठी हातभार लावला. मला अगोदरच्या कार्यकाळात उमेदवारीचा शब्द मिळाला होता. नेत्यांचे कौतुक केल्याने मी पक्षात राहिलो. पक्षासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावले. त्यांनी ती जागा निवडून आणली. पुढच्या निवडणुकीतही पक्षाचा विजय झाला. संदीप नाईक यांच्या म्हणण्यानुसार, माझ्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली आहे.

बावनकुळेंना संदीप नाईक यांचा राजीनामा पत्र.

संदीप नाईक यांनी बावनकुळे यांना भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. संदीप नाईक हे नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. पक्षाचे सदस्य आणि जिल्हाध्यक्षपद त्यांनी सोडले आहे. त्यामुळे आता बेलापूर मतदार संघामध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा: भाजपने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी! कल्याणमध्ये गणपत गायकवाड तिकीट कापले, तरीही…

वडील भाजपमध्ये आणि मुलगा शरद पवार गटात

बेलापूर आणि ऐरोली येथून गणेश नाईक यांनी त्यांचा मुलगा संदीप याला उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली होती. रविवारी भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांचे नाव दावेदार होते. बेलापूरच्या जागेने मंदा म्हात्रे यांना पुन्हा संधी दिली. संदीप नाईक यांनी अखेर शरद पवारांच्या गटात सामील होऊन बेलापूर मतदार संघातुन मंदा म्हात्रे यांच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांनी संदीप यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता शरद पवारांच्या यादी मध्ये कोणाचे नाव येणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sandeep Naik Joins Sharad Pawar Party

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आणखी एक ठाकरे रिंगणात, मनसेच्या 45 उमेदवारांची घोषणा, आदित्य ठाकरे आणि मनसेचे संदीप देशपांडे आमनेसामने..

Tue Oct 22 , 2024
MNS 45 Candidates Of Announced in Vidhanshaba: महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करण्यात आलेल्या एकूण 45 उमेदवारांची नावे […]
MNS 45 Candidates Of Announced in Vidhanshaba

एक नजर बातम्यांवर