Rupali Patil Thombre Post Viral: अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत. पक्षश्रेष्ठी अजित पवार आणि प्रसारमाध्यमांना त्यांनी अनेकदा पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध पक्षांचे प्रदर्शन सुरू आहे. निवडणुकीनंतर राजकीय क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. अजित पवार गटातील महिला नेत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. अजित पवार गटाच्या प्रमुख रुपाली पाटील ठोंबरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात राजकीय वाद रंगला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी याच महिला नेत्याला जबाबदारी देणार आणि किती संधी देणार हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे अजित पवार गटात आता अंतर्गत वाद सुरु आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांच्याकडे सोपवण्यात आली. यामुळे रुपाली पाटील ठोंबरे या नाराज झाल्या. रुपाली चाकणकर यांना पक्षातूनच विरोध होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. एक व्यक्ती एक पद नियमानुसार रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घ्या, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती. तेव्हा रुपाली चाकणकर यांनी मी घराबाहेर असल्याचा दावा केला. मी जर बाहरेची असेल तर मी बाहेरच जाते. मात्र दादा मला बोलले की मी तुम्हाला पक्षप्रवेश दिला आहे त्यामुळे तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडा.
Rupali Patil Thombre Post Viral
रुपाली पाटील ठोंबरेंची फेसबुक पोस्ट
यानंतर आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी अप्रत्यक्षरित्या रुपाली चाकणकरांना टोला लगावला आहे. तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा…? दयाकुछतोगडबडहै अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.
हेही वाचा: मनोज जरंगेची मोठी खेळी,अंतरवाली बैठकीतून महत्त्वाची घोषणा?
एकाच महिलेला किती संधी देणार?
अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत. पक्षश्रेष्ठी आणि प्रसारमाध्यमांना त्यांनी अनेकदा पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. याशिवाय, त्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत. रुपाली चाकणकर यांना आता विविध पदे मिळत आहेत, असे असले तरी. त्यामुळे त्याच महिलेला कितपत पद मिळणार असा सवाल रूपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे.