Prime Minister Modi’s remarks on Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या आक्रमणाला यंदा 1000 वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक टप्प्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिराच्या गौरवशाली परंपरेवर विशेष लेख लिहून भारताच्या सांस्कृतिक शक्तीची आठवण करून दिली आहे. परकीय आक्रमकांनी मंदिर उद्ध्वस्त करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र सोमनाथचा आत्मा कधीच पराभूत झाला नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

पंतप्रधान मोदींनी सोमनाथला केवळ एक मंदिर न म्हणता भारताच्या आत्म्याचं प्रतीक असल्याचं नमूद केलं. श्रद्धा, परंपरा आणि स्वाभिमान यांचा संगम असलेलं हे ज्योतिर्लिंग आजही कोट्यवधी भारतीयांच्या विश्वासाचं केंद्र आहे.
सोमनाथ : भारताच्या आत्म्याचं प्रतीक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रभास पाटण येथे वसलेलं सोमनाथ मंदिर हे द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं. प्राचीन ग्रंथांमध्येही सोमनाथचा उल्लेख आढळतो, जो भारताच्या आध्यात्मिक परंपरेची साक्ष देतो.
हे वाचा: निवडणुकीपूर्वी कल्याणमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये मोठी अडचण आहे. ठाकरे गटाने १ ते २ कोटी रुपये मागितल्याचा.
त्यांच्या मते, सोमनाथ हे केवळ धार्मिक स्थळ नसून भारतीय संस्कृतीचा शाश्वत अवतार आहे. याच कारणामुळे परकीय आक्रमकांनी या मंदिराला लक्ष्य केलं.
2026 वर्ष का ठरणार ऐतिहासिक?
पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, 2026 हे वर्ष सोमनाथ मंदिरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या वर्षी मंदिरावरील पहिल्या आक्रमणाला 1000 वर्ष पूर्ण होत आहेत. जानेवारी 1026 मध्ये गझनीच्या महमूदने सोमनाथ मंदिरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केलं होतं.
या आक्रमणाचा उद्देश केवळ मंदिर नष्ट करणं नव्हता, तर भारतीय श्रद्धा आणि सभ्यतेचा कणा मोडणं हाच होता, असं त्यांनी लेखात नमूद केलं.
पुनर्बांधणीचे अखंड प्रयत्न
सोमनाथ मंदिरावर झालेला हल्ला हा मानवी इतिहासातील एक मोठा आघात असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. मात्र, या आक्रमणानंतरही मंदिर पुन्हा उभारण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले.
मंदिराचं सध्याचं भव्य स्वरूप 1951 साली अस्तित्वात आलं. 11 मे 1951 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. विशेष म्हणजे, 2026 मध्ये या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत.
स्वाभिमानाची अखंड गाथा
“सोमनाथची कथा ही विनाशाची नाही, तर भारताच्या कोट्यवधी नागरिकांच्या स्वाभिमानाची आहे,” असं पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितलं. दीर्घ गुलामगिरीचा काळ, वारंवारचे आक्रमण आणि संघर्ष असूनही सोमनाथ मंदिर अधिक भक्कमपणे उभं राहिलं.
Jai Somnath!
— Narendra Modi (@narendramodi) January 5, 2026
2026 marks 1000 years since the first attack on Somnath took place. Despite repeated attacks subsequently, Somnath stands tall! This is because Somnath’s story is about the unbreakable courage of countless children of Bharat Mata who protected our culture and…
हे मंदिर एकेकाळी आध्यात्मिक केंद्रासोबतच आर्थिकदृष्ट्या सक्षम समाजाचं प्रतीक होतं. भारताच्या सागरी व्यापारामुळे सोमनाथच्या वैभवाच्या कथा दूरदूरपर्यंत पोहोचल्या होत्या.
आपल्या संस्कृतीची जिवंत साक्ष
दक्षिण भारतातील प्राचीन मंदिरे आणि सोमनाथसारखी ऐतिहासिक स्थळं ही भारतीय संस्कृतीची जिवंत उदाहरणं असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. ही मंदिरे केवळ दगडांची रचना नसून, शतकानुशतके चालत आलेल्या राष्ट्रीय चेतनेचं प्रतीक आहेत.
शेकडो वेळा उद्ध्वस्त होऊनही ही मंदिरे पुन्हा उभी राहिली. हीच भारताची राष्ट्रीय जीवनशक्ती असून, त्यातूनच आपल्याला प्रेरणा घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.
